चेन्नई - आंध्र प्रदेशचे विशाखापट्टण शहर हत्येने हादरलं. पेंदुर्थी मंडळ जुत्तादा येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांना ठार मारले आहे. यात सहा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. हत्येनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बतिना अप्पाला राजू असे आरोपीचे नाव आहे.
मृतांमध्ये बम्मिडी रामणा (63), बम्मिडी उशाराणी (35) अल्लुरी रामादेवी (53), नकेटला अरुणा (37) बम्मिडी उदय (2) आणि बम्मिडी उर्विशा (सहा महिन्याचे बाळ) यांचा समावेश आहे.
या हत्याकांडाचे कारण तीन वर्षांपूर्वी असल्याचे समोर आले आहे. बम्मिडी रामणाचा मुलगा विजय किरणने आप्पाला राजूच्या मुलीवर बलात्कार केला होता. 2018 मध्ये विजया किरण यांच्याविरोधात पेंदुर्थी पोलीस स्टेशनमध्ये अप्पलराजूने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. तर विजय किरणची पत्नी उशाराणीने आप्पाला राजूविरोधात पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. हे दोन्ही खटले अजूनही ठाण्यात प्रलंबीत आहेत. या घटनेनंतर विजय किरणचे कुटुंब विजयवाडा येथे स्थायिक झाले होते. कुटुंबातील एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते गावी आले होते. तेव्हाच डाव साधत आरोपीने कुटुंबीयांना ठार केले.
तीन वर्षांपूर्वी आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आरोपीने सहा जणांची हत्या केली आहे. बाम्मिडी कुटुंबात त्यांच्या मुळ गावी पुढील महिन्यात लग्न होते. कुटुंबातील सर्व सदस्य लग्नाच्या कामांमध्ये व्यस्त होती. पहाटे सहा वाजता आरोपीने सर्वाची निर्दयपणे हत्या केली. आरोपीने लहान मुलांवरही दया दाखवली नाही. त्यानंतर जवळच असेलेल्या पेंदुर्थी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
हेही वाचा - पैशांच्या वादातून पार्टनरचा खून, एका आरोपीला अटक