वानापार्थी (कर्नाटक) - कधी कोणाचा मृत्यू कसा होईल, याबाबत काही सांगता येत नाही. म्हशीच्या शेपटीने गळा आवळून एका व्यक्तीचा विचित्र मृत्यू झाल्याची घटना वानापार्थी जिल्ह्यातील नागावरम् याठिकाणी घडली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.
अनैसर्गिक लैंगिक कृत्याची शंका -
शनिवारी सकाळी मृत व्यक्ती नागावरम गावाच्या दिशेने जात होता. त्याला गुम्माडम बालरेड्डी यांच्या घरी बांधून असलेली एक म्हैस दिसली. तो म्हशीजवळ गेला. मात्र काही वेळातच म्हशीच्या शेपटीने त्याच्या गळ्याला घट्ट पकडले आणि त्यामुळे गळा आवळून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. काही वेळानंतर नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृत व्यक्तीच्या अंगात कोणतेही कपडे नव्हते. तसेच तेथील नागरिकांनी म्हशीवर लैंगिक कृत्य केल्याची शंका व्यक्त केली. मृत व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडून दिले आहे. तसेच काही महिन्यांपासून तो प्राण्यांवर लौगिंक कृत्य करित असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान असाच एक प्रकार तेलंगणा राज्यातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात घडला. रमेश नावाच्या एका व्यक्तीला म्हशीसोबत अनैसर्गिक लैंगिक कृत्य करताना पकडण्यात आले. दारू पिऊन त्याने हे कृत्य केले. तसेच तो नेहमीच प्राण्यांसोबत लैंगिक कृत्य करित असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. म्हशीसोबत लैंगिक कृत्य करत असताना स्थानिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप देत दोराने त्याचा पाय बांधून ठेवण्यात आले.