ETV Bharat / bharat

राम मंदिर उद्घाटनापुर्वी मुद्रांक व नोंदणी विभागाला 'अच्छे दिन'; वाऱ्याच्या वेगानं होतेय जमिनीची विक्री

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 11:42 AM IST

Consecration of Ram Temple : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या् आधी अयोध्येत बरीच जमीन विक्रीचे व्यवहार होत आहेत. अयोध्येतील जमिनींची रेकॉर्ड रजिस्ट्री केली जात असल्यानं यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.

Consecration of Ram Temple
Consecration of Ram Temple

लखनऊ Consecration of Ram Temple : भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर उभारणीमुळं अयोध्या हे एक नवीन व्यावसायिक स्थान म्हणून उदयास आलंय. अयोध्या शहर आणि आसपासच्या महामार्गांवर व्यावसायिक मालमत्ता तसंच निवासी मालमत्ता खरेदी करुन लोक गुंतवणूक करत आहेत. अलीकडेच मुद्रांक विभागाला अयोध्येत केलेल्या नोंदणीतूनही भरपूर कमाई होत आहे. सरकारला इथून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. कमी कालावधीत जमिनीच्या अनेक पट अधिक नोंदणी झाल्या आहेत. एक काळ होता जेव्हा इतर मोठ्या शहरांमध्ये लोक व्यवसाय करण्यासाठी मालमत्ता खरेदी करत होते. परंतु आता लोक 'रामनगरी' अयोध्येत जमीन खरेदी करत आहेत.

मुद्रांक व नोंदणी विभागाच्या आकडेवारीत दीड पटीनं वाढ : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. धार्मिक नगरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून, आता राम मंदिराच्या उभारणीला चांगलाच वेग आलाय. याबाबत अनेक व्यावसायिक आणि इतर लोकांना केवळ अयोध्येतच व्यवसाय करायचा नसून त्यांना अयोध्येत राहायचं आहे. त्यामुळंच मुद्रांक व नोंदणी विभागाच्या आकडेवारीत अलिकडच्या वर्षांत दीड पटीनं वाढ झालीय. यामुळं मुद्रांक आणि नोंदणी विभागाला अयोध्येतील जमिनींच्या रजिस्ट्रीतूनही भरपूर पैसा मिळतोय.

धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अयोध्या अव्वल स्थानावर : लोक अयोध्यामध्ये जमीन खरेदी करत आहेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहेत. इथं आश्रम हॉटेल, गेस्ट हाऊस, विश्रामगृहं, मंदिरांसाठी मालमत्ता खरेदी केली जात आहे. पाच वर्षांपूर्वी अयोध्येत वर्षाला सुमारे 28,000 रजिस्ट्री होत्या. आता ही संख्या 50,000 च्या वर पोहोचली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर कोट्यवधी भाविक येण्याचे अंदाजही वर्तवले जात आहेत. उत्तर प्रदेशसाह इतर राज्यांतून दररोज लाखो भाविक सातत्यानं अयोध्येला पोहोचत आहेत. याचाच परिणाम असा आहे की अयोध्या धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचत आहे.

महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ : अयोध्येत आणि आजूबाजूच्या परिसरात जमीन खरेदी करुन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची चढाओढ सुरु आहे. मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत अयोध्येतील महसूल 92 कोटी रुपयांवरुन 178 कोटी रुपयांवर पोहोचलाय. नोंदणीकृत जमिनीची सरकारी किंमत 3500 कोटींहून अधिक झालीय. अयोध्येत लोक सतत मालमत्ता खरेदी करत आहेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत. त्यामुळं मुद्रांक व नोंदणी विभागाच्या महसुलात सातत्यानं वाढ होत आहे.

काय म्हणतात राज्यमंत्री : मुद्रांक आणि नोंदणी विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री रवींद्र जैस्वाल म्हणतात की, "अयोध्या 'रामनगरी' नावानं प्रसिद्ध आहे. आता तिथं भव्य राम मंदिर बांधलं जातंय. 22 जानेवारीला एक मोठा कार्यक्रम होणार आहे, अशा परिस्थितीत लोक अयोध्येत जमीन खरेदी करुन आपला व्यवसाय सुरु करत आहेत. त्यामुळं अयोध्येत रजिस्ट्रींची संख्या मोठी असून साहजिकच या विभागाला महसूल वाढू लागलाय."

  • 2018 मध्ये अयोध्येत 28,000 हून अधिक रजिस्ट्री झाल्या आणि सरकारला यातून सुमारे 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
  • गेल्या वर्षी 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 37000 रजिस्ट्री झाल्या आणि त्यातून सरकारला 160 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
  • 2023-24 या आर्थिक वर्षात अयोध्येत 46000 हून अधिक रजिस्ट्री झाल्या आणि यातून सरकारला तब्बल 178 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

हेही वाचा :

  1. श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा राष्ट्रीय सण जाहीर; ममता बॅनर्जी म्हणाल्या, ' भाजपाची नौटंकी'
  2. अयोध्या निमंत्रणाला राजकीय रंग; काँग्रेसने नाकारलं राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण
  3. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम 16 जानेवारीपासूनच होणार सुरू, कसा होणार अभिषेक?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.