ETV Bharat / bharat

Government employee raped woman: सरकारी कर्मचाऱ्याचा विवाहितेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार - government employee raped a married woman

तेलंगणात एका सरकारी कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केला. त्याने तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

सरकारी कर्मचाऱ्याचा विवाहितेला अंमली पदार्थ देऊन बलात्कार

author img

By

Published : Jul 25, 2022, 1:38 PM IST

हैदराबाद: एका सरकारी कर्मचाऱ्याने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगू नये यासाठी त्याने तिला मोबाईलवर तिचे नग्न छायाचित्र दाखवून धमकी दिली. हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी त्याने तिला दिली.

आरजीआयए पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदावत चंदुलाल (४०) हे शमशाबाद उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून काम करतात. पतीच्या निधनानंतर एक महिला (26) रोजगारासाठी शमशाबाद येथे आली आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. तिच्यावर नजर असलेला चंदुलाल तिला त्रास देत होता. तिने नकार दिल्याने तो गुंगीचे औषध रुमालात टाकून तिच्या घरी गेला. दार उघडल्यावर त्याने तिच्या नाकावर रुमाल ठेवला. त्याने बेशुद्ध झाल्यावर महिलेवर बलात्कार केला आणि तिची नग्न छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने तिथून पोबारा केला.

चंदुलालने महिलेची नग्न छायाचित्रे तिच्या मोबाईलवर पाठवली आणि तिला धमकी दिली. तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - Tantra mantra to alive dead man: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीला तंत्र-मंत्राने जिवंत करण्याच अघोरी प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.