नवी दिल्ली - लंडन ऑलिम्पिकमध्ये ( 2013) कुस्तीत रौप्यपदक जिंकणाऱ्या सुशील कुमारवर दिल्ली न्यायालयाने खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर कृत्ये आणि इतर गुन्हेगारी आरोपांखाली आरोप ठेवले आहेत. (Sagar Dhankar) यामध्ये सुशील कुमारसह इतर १७ ज्युनियर कुस्तीपटूंचा समावेश आहे. या सर्वांवर कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येचा आरोप आहे. न्यायालयाने अन्य दोन फरार आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत.
4 मे 2021 रोजी सोनीपतचा रहिवासी असलेला कुस्तीपटू सागर धनखर याला दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये काही लोकांनी बेदम मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी अथक परिश्रमानंतर कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली होती. सध्या दिल्लीतील रोहिणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यामध्ये 18 आरोपी तुरुंगात आहेत. तर अन्य दोघे फरार आहेत.