रुद्रप्रयाग ( उत्तराखंड ) - नांदेड येथील एक पठ्ठ्या सायकलवर भारत भ्रमंतीवर निघाला आहे. रविवार (दि. 22 मे) तो केदारनाथ येथे पोहोचला आहे. केदारनाथ येथील डोंगर सर करताना सायकल घेऊन करणार असल्याचे त्याने सांगितले. शिवाजी पाटील, असे त्या तरुणाचे नाव आहे. नांदेडहून तो 15 नोव्हेंबर, 2021 पासून त्याने नांदेड येथून प्रवासाला सुरुवात केली. 20 महिन्यात संपूर्ण भारत भ्रमंती करुन नांदेड गाठण्याचे त्याचे नियोजन आहे.
भारत स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी तसेच भारतातील विविध राज्यांतील भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती इत्यादी जाणून घेण्यासाठी भारत भ्रमंती करत असल्याचे शिवाजी याने सांगितले. त्याने द महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड येथे तब्बल 12 हजार किलोमिटरचा प्रवास करुन पोहोचला आहे. महिनाभर उत्तराखंड राज्य फिरून हिमाचल प्रदेश, लेह लडाख, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, असा प्रवास करणार आहे.
हेही वाचा - हरियाणात पकडलेल्या चारही दहशतवाद्यांनी केली होती नांदेडसह विविध भागात 'रेकी'