देवास (म.प्र) - कुठलेही काम शिकण्याला वयाचे बंधन नाही. याचा प्रत्यय देवास येथील एका घटनेतून आला आहे. जिल्ह्यातील बिलावली गावात राहणाऱ्या वृद्धा रेशम बाई या केवळ तीन महिन्यांत वाहन चालवणे शिकल्या. त्या अनुभवी ड्राइव्हर सारख्या कार चालवतात. विशेष म्हणजे, त्या 90 वर्षांच्या आहेत. या वयात देखील त्या चांगल्या प्रकारे कार चालवत असल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्विट करून त्यांचे कौतुक केले आहे.
-
दादी मां ने हम सभी को प्रेरणा दी है कि अपनी अभिरुचि पूरी करने में उम्र का कोई बंधन नहीं होता है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
उम्र चाहे कितनी भी हो, जीवन जीने का जज़्बा होना चाहिए! https://t.co/6mmKN2rAR2
">दादी मां ने हम सभी को प्रेरणा दी है कि अपनी अभिरुचि पूरी करने में उम्र का कोई बंधन नहीं होता है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 23, 2021
उम्र चाहे कितनी भी हो, जीवन जीने का जज़्बा होना चाहिए! https://t.co/6mmKN2rAR2दादी मां ने हम सभी को प्रेरणा दी है कि अपनी अभिरुचि पूरी करने में उम्र का कोई बंधन नहीं होता है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 23, 2021
उम्र चाहे कितनी भी हो, जीवन जीने का जज़्बा होना चाहिए! https://t.co/6mmKN2rAR2
हेही वाचा - अबब..! ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्यांना घातला, पाहा व्हिडिओ..
तीन महिन्यांत शिकली ड्राइव्हिंग
आपली नात गाडी चालवत असल्याचे पाहून रेशम बाई यांनी देखील आपल्या मुलांपुढे कार चालवण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी अनेकदा त्यांच्या मुलांनी त्यांना कार न चालवण्यास समजवून सांगितले, मात्र रेशम बाईंनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर त्यांच्या छोट्या भावाने त्यांना ड्राइव्हिंग शिकवली. रेशम बाई यांना गॅजेट्सही आवडतात, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगतात. लोकांना मोबाईल वापरत असल्याचे पाहून रेशम बाई यांना देखील टच स्क्रिन मोबाईल वापरण्याची इच्छा झाली, त्यामुळे त्यांना अँड्रॉईड मोबाईल देखील देण्यात आला आहे.
90 वर्षीय आजीचे मुख्यमंत्री चौहान यांनी केले कौतुक
राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या आजीचे कौतुक केले आहे. त्यांनी व्हिडिओवर शेअर करत लिहिले की, आजींनी सर्वांना प्रेरणा दिली आहे की, आवड पूर्ण करण्याला वयाचे बंधन नसते. वय कितीही असो, आयुष्य जगण्याची आवड असली पाहिजे.
10 वर्षांपूर्वी चालवत होत्या ट्रॅक्टर
90 वर्षीय रेशम बाई या 10 वर्षांपूर्वी ट्रॅक्टर देखील चालवत होत्या. इतके वय असतानाही त्या स्वत:चे काम स्वत: करतात. भल्या सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर त्या सर्वात आधी पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. त्यानंतर त्या शेती करतात. रेशम बाई यांना 4 मुले आणि 2 मुली देखील आहेत, त्यांचे लग्न झालेले आहे. विशेष म्हणजे, रेशम बाई या आजी, आई आणि सासू या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
हेही वाचा - पीएम केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही; पंतप्रधान कार्यालयाची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती