ETV Bharat / bharat

harbhajan kaur startup : हरियाणातील हरभजन कौर यांचा वयाच्या 94 व्या वर्षी यशस्वी स्टार्टअप; दर महिन्याला कमवितात 1 लाख रुपये - harbhajan kaur startup

हरभजन कौर यांनी 4 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 90 व्या ( 94 Years Old Lady Startup ) वर्षी स्वतःचा स्टार्टअप ( Harbhajan Kaur Besan Ki Barfi Startup )  सुरू केला. हा आज एक ब्रँड ( Harbhajan Kaur Besan Barfi ) बनला आहे.

हरभजन कौर
हरभजन कौर
author img

By

Published : Apr 22, 2022, 10:55 PM IST

चंदीगड - 'म्हातारपणात केवळ काठीचा आधार असतो. पण चंदीगडमध्ये राहणाऱ्या ९४ वर्षीय हरभजन कौर ( 94 Year Old Entrepreneur In Chandigarh ) यांनी स्टार्टअप हादेखील म्हतारपणात आधार असतो, हे दाखवून दिले आहे. त्या दर महिन्याला एक लाख रुपये कमवित आहेत. तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुमच्या वयात फरक पडत नाही, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

हरभजन कौर यांनी 4 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 90 व्या ( 94 Years Old Lady Startup ) वर्षी स्वतःचा स्टार्टअप ( Harbhajan Kaur Besan Ki Barfi Startup ) सुरू केला. हा आज एक ब्रँड ( Harbhajan Kaur Besan Barfi ) बनला आहे. हरभजन कौर यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात बेसन बर्फी बनवून केली होती. पण आज त्या बेसनाच्या बर्फीसोबत लोणची, अनेक प्रकारच्या चटण्या आणि शरबतदेखील बनवतात. ही उत्पादने लोकांना खूप आवडतात.

वयाच्या 94 व्या वर्षी यशस्वी स्टार्टअप

आयुष्यभर एक रुपयाही कमावला नाही- ईटीव्ही भारतशी संवाद साधताना हरभजन कौर म्हणाल्या, की आज ९४ वर्षांचे झाली आहे. मनात नेहमीच एक इच्छा असायची की स्वतःसाठी काहीतरी काम करावे. कारण आयुष्यातील प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. आई-वडिलांची काळजी घेणे असो, लग्न असो किंवा घरचे असो, जबाबदारी पार पाडली आहे. हरभजन म्हणाल्या की, या सगळ्यात मी स्वतःहून कधीच कोणतेही काम केले नाही. आयुष्यभर एक रुपयाही कमावला नाही. स्वत: काहीतरी काम करून आपल्या कामातून पैसा कमवावा, ही मनात एक अपूर्ण इच्छा होती. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला.

बेसन बर्फी
बेसन बर्फी

अशा प्रकारे सुरू झाले स्टार्ट-अप - आईचे वाढते वय पाहून एके दिवशी हरभजन कौर यांची मुलगी रवीना सूरीने तिला विचारले की तुला कुठे जायचे आहे? तेव्हा हरभजन कौर म्हणाल्या की, आजपर्यंत मी पैसे कमावले नाही, याचे मला वाईट वाटते. तेव्हा त्यांच्या मुलीने विचारले तुला काय करायचे आहे. तेव्हा हरभजन म्हणाल्या, की मी आयुष्यभर घरीच अन्न शिजविले आहे. बेसनाची बर्फी कशी बनवायची ते मला माहीत आहे. मला ते विकून पैसे कमवायचे आहेत. मी बनवलेली बेसन बर्फी कोणीतरी विकत घेईल. येथून स्टार्टअपचा पाया रचला गेला.

हरभजन कौर ब्रँड
हरभजन कौर ब्रँड

लोकांना बर्फी आवडल्या - सर्वप्रथम हरभजन कौर यांच्या मुलीच्या मदतीने बनवलेल्या बेसनाच्या बर्फी बाजारात लोकांना मोफत खायला दिल्या होत्या. लोकांना व दुकानदारांना बर्फी खूप आवडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बर्फीच्या ऑर्डर्स त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांनी पहिल्या कमाईची तिन्ही मुलींमध्ये समान वाटणी केली. यानंतर आईचा छंद पूर्ण झाला, असे कुटुंबीयांना वाटले. आता आई विश्रांती घेईल, असे त्यांना वाटले

आनंद महिंद्रांच्या ट्विटवरून बनवलेला ब्रँड - ऑर्डर्सची संख्या वाढू लागल्यावर हरभजन कौर यांनी बर्फी बनवायला सुरुवात केली. हरभजन कौर यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. तेव्हा त्यांनीही त्यांचे कौतुक करणारे ट्विट केले. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर त्यांच्याकडे येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या आणखी वाढली आहे. मग घरी एवढ्या प्रमाणात माल तयार करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मोहालीत एक जागा घेतली. तिथे स्वयंपाकघर सुरू केले. आता मोहालीतच उत्पादन घेतले जाते. त्याने काही लोकांना प्रशिक्षित करून आपल्यासोबत काम करायला लावले आहे.

मेहनत केली यश नक्की मिळते- रवीना सूरी यांनी सांगितले की बेसन बर्फी दोन पॅकिंगमध्ये विकली जाते. एक म्हणजे 450 ग्रॅमचे पॅकिंग. त्याचा दर 550 रुपये आहे. 800 ग्रॅमचे पॅकिंग आहे. त्याचाचा दर 850 रुपये आहे. बेसनाची बर्फी व्यतिरिक्त बदामाचे सरबत, लौकीचे आईस्क्रीम, टोमॅटोची चटणी, मसूराची खीर, लोणचेही बनविले जाते. बर्फीला चंदीगडच्या आठवडी सेंद्रिय बाजारात मोठी मागणी आहे. हरभजन कौर म्हणाल्या की, इच्छा पूर्ण करण्यासाठी वय नसते. आपण कधीही हार मानू नये. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पुन्हा आयुष्य सुरू करू शकतो. मेहनत केली तर यश नक्की मिळते.

हेही वाचा-Digital Attendance Machine : शाळेत डिजिटल हजेरी, पंच करताच पालकांना जातो संदेश

हेही वाचा-Gang Rape on Mentally Retarded Woman : विजयवाडा सरकारी रुग्णालयात गतिमंद महिलेवर सामूहिक बलात्कार

हेही वाचा-CCTV of Woman falls into manhole : रस्त्यावर चालताना मोबाईलवर बोलणे महागात... महिला कोसळली मॅनहोलमध्ये!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.