ETV Bharat / bharat

Karnataka Election 2023 : 92 वर्षांचे शिवशंकरप्पा सलग तीन टर्मपासून आहेत आमदार, यंदाही लढणार निवडणूक! - दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघ

कर्नाटकच्या दावणगेरे दक्षिण मतदारसंघाततील कॉंग्रेस नेते शामनूर शिवशंकरप्पा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते 92 वर्षांचे आहेत. यावेळी त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपने लिंगायत समाजातील तरुण उमेदवार उभा केला आहे.

Shamanur Shivshankarappa
शामनूर शिवशंकरप्पा
author img

By

Published : Apr 18, 2023, 7:39 PM IST

दावणगेरे (कर्नाटक) : शामनुर शिवशंकरप्पा हे कर्नाटकच्या दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून सलग तीन वेळा व एकूण पाच वेळा निवडून आलेले सर्वात वयस्कर राजकारणी आहेत. ते वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील असून त्यांचे वय 92 वर्षे आहे! विशेष म्हणजे या वयातही ते चौथ्यांदा दावणगेरे दक्षिणमधून भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहेत.

या मतदारसंघात मुस्लिम मतांचे प्राबल्य : दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतांचे प्राबल्य आहे. तब्बल 83 हजार मुस्लिम मते असलेला हा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे. 2008 मध्ये या मतदारसंघाचे विभाजन झाल्यापासून शामनूर शिवशंकरप्पा हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. दावणगेरे दक्षिण मतदारसंघातील 92 वर्षांचे काँग्रेसचे उमेदवार शामनुर शिवशंकरप्पा हे कर्नाटकच्या 224 मतदारसंघातील सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत.

शामनूर यांची राजकीय कारकीर्द : शामनूर शिवशंकरप्पा यांनी 1994 मध्ये राजकारणात पदार्पण केले. वयाच्या 64 व्या वर्षी म्हणजे 1994 मध्ये ते पहिल्यांदा दावणगेरे नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले. पुढे 1994 मध्ये त्यांनी दावणगेरे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2008 ते 2013 आणि 2018 मध्ये मतदारसंघाचे विभाजन झाले तेव्हा ते पाच वेळा दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1997 मध्ये ते लोकसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले होते. मात्र 1999 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

शिवशंकरप्पा यांच्या विरोधात भाजपकडून नवा चेहरा : 92 वर्षांचे शिवशंकरप्पा आता पुन्हा एकदा एखाद्या तरुणासारखे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बीजेपीचे उमेदवार बीजी कुमार आहेत यांनी त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून ते संपूर्ण मतदारसंघात जोरात प्रचार करत आहेत. भाजपने या आधी येथून यशवंतराव जाधव यांना तिकीट दिले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. यावेळी शामनूर शिवशंकरप्पा यांच्या विरोधात भाजपने नवा चेहरा माजी महापौर बी.जी. अजयकुमार यांना रिंगणात उतरवले आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना शामनूर शिवशंकरप्पा म्हणाले की, मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझ्यावर आहे. माझे वय 92 वर्षे असूनही मी निवडणूक लढवत आहे. आपण पुन्हा विजयी होऊ, जनतेच्या पाठिंब्याने दक्षिण मतदारसंघात सलग विजयी होत असून, यावेळीही आपण विजयी होऊन इतिहास घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मतदारसंघात शिवशंकरप्पा यांचा प्रभाव : भाजपचे उमेदवार बीजी अजय कुमार यांचे येथील मुस्लिम समाजाशी चांगले संबंध असून ते अल्पसंख्याक वसाहतींमधील विकासकामांसाठी मुस्लिम समाजात प्रसिद्ध आहेत. शामनूर शिवशंकरप्पा यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात विजयकुमार यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. 2018 च्या निवडणुकीत शामनूर शिवशंकरप्पा यांनी भाजपचे उमेदवार यशवंतराव जाधव यांच्या विरोधात तिसर्‍यांदा 15,884 मतांनी विजय मिळवला होता. शामनुर शिवशंकरप्पा यांना 71,369 मते मिळाली होती, तर यशवंतराव जाधव यांना 55,485 मते मिळाली होती.

सिद्धरामय्या मंत्रिमंडळात मंत्री होते शामनूर : शामनूर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कारकिर्दीत एपीएमसी मंत्री होते. त्यांनी दावणगेरे प्रभारी मंत्री म्हणून बरीच विकास कामे केली आहेत. वडिलांच्या वयावर भाष्य करताना त्यांचा मुलगा व माजी मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी विश्वास व्यक्त केला की, माझे वडील या वयातही जोरात प्रचार करत असून यावेळी ते विजयी होऊन संपूर्ण राज्यात इतिहास घडवतील.

हेही वाचा : Droupadi Murmu Shimla Visit : राष्ट्रपती मुर्मूंचा हिमाचल दौरा, जवानांनी दिला गार्ड ऑफ ऑनर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.