ETV Bharat / bharat

Gujrat Wall Collapsed : मिठाच्या कारखान्यात भिंत अंगावर कोसळून 12 कामगारांचा दुर्दैवी अंत

गुजरातमधील हलवड औद्योगिक क्षेत्रातील ( Gujrat Halvad Morbi GIDC ) एका कारखान्यात भिंत अंगावर कोसळून ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू ( Workers Killed In Wall Collapsed ) झाला. आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत आणखीही काही कामगार भिंतीखाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Gujrat Wall Collapsed
भिंत अंगावर कोसळून ९ कामगारांचा दुर्दैवी अंत
author img

By

Published : May 18, 2022, 1:45 PM IST

Updated : May 19, 2022, 6:08 AM IST

अहमदाबाद ( गुजरात ) : गुजरातमधील हलवड औद्योगिक क्षेत्रातील ( Gujrat Halvad Morbi GIDC ) एका कारखान्यात भिंत अंगावर कोसळल्याने 12 कामगारांचा दुर्दैवी अंत ( Workers Killed In Wall Collapsed ) झाला. आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत आणखीही काही कामगार भिंतीखाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील हलवार जीआयडीसीमध्ये बुधवारी मीठ कारखान्याची भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीखाली सुमारे 30 मजूर गाडले गेले. त्यापैकी आतापर्यंत १२ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात येत आहे. सागर सॉल्ट नावाच्या कारखान्यात ही मोठी दुर्घटना घडली. भिंतीखाली सुमारे 30 मजूर गाडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्यासाठी जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली आहे. 30 हून अधिक कामगार गाडले गेल्याने मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

जेवणाच्या सुट्टीमुळे कामगारांचे वाचले प्राण-भिंतीजवळ मिठाचे पोत्या ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भिंतीवर जास्त दाब असल्याने भिंत कोसळून तेथे पॅकिंग करणाऱ्या कामगारांवर पडली. हा अपघात मध्यान्ह भोजनाच्या वेळी घडल्याने बहुतांश कामगार कारखान्यातून बाहेर पडले होते. अन्यथा या अपघातात इतर अनेक मजुरांचा बळी गेला असता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर व्यक्त केला शोक-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, 'मोरबीमध्ये भिंत कोसळण्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमींची तब्येत लवकर बरी व्हावी. स्थानिक अधिकारी जखमींना शक्य ती सर्व मदत करत आहेत. त्याच वेळी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोरबी मीठ कारखान्यातील भिंत कोसळून झालेल्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना सीएम रिलीफ फंडातून 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरबीचे जिल्हाधिकारी आणि यंत्रणा चालकांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • The tragedy in Morbi caused by a wall collapse is heart-rending. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. May the injured recover soon. Local authorities are providing all possible assistance to the affected.

    — Narendra Modi (@narendramodi) May 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-Hardik Patel resigns : काँग्रेसचे नेते हार्दिक पटेलांचा राजीनामा.. भाजपात जाण्याची शक्यता?

हेही वाचा-Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हेही वाचा-Oxygen Gas Pipe Theft : चोरांचा निर्दयीपणा, बिहारमध्ये रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपची चोरी

Last Updated : May 19, 2022, 6:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.