नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. याचसाठी आज लोक जीवनात योगाचा अवलंब करत आहेत. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज, मंगळवारी जगभरात ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे.
या दिवशी अनेक देशांतील लोक योग दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमून योग करताना दिसतात. देशभरात योग दिन यशस्वी करण्यासाठी विविध तयारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील 75 मंत्री देशातील 75 विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणी योग करताना दिसणार आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास - आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा पुढाकार भारताने घेतला होता. 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. 2015 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम - दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी थीम निवडली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी 'मानवतेसाठी योग' ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम म्हणून निवडण्यात आली आहे. ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग आहे.
योगासनांचे महत्त्व - आजच्या आधुनिक युगात व्यग्रतेतही शरीर निरोगी आणि मन ठेवण्यासाठी योगासने प्रत्येकाला मदत करते. सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. रोज योगासने केल्याने शारीरिक आणि मानसिक उर्जेच्या विकासासोबत तणाव आणि नैराश्यही कमी होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 वर विशेष - यावर्षी 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पीएम मोदी कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस मैदानावर योग करताना दिसतील. त्याचवेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील 75 मंत्री देशातील 75 विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर योग करताना दिसणार आहेत. यादरम्यान नाशिकच्या पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात गृहमंत्री अमित शहा, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर (एस. जयशंखर) दिल्लीतील लोटस टेंपलमध्ये योग करताना दिसतील.