बोताड (गुजरात) - गुजरातमध्ये दारु बंदी लागू केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात बेकायदेशीर दारुचा सुळसुळाट सुरु आहे. यावरुन मोठ्या प्रमाणात अनेक वाद निर्माण झाले असून राजकीय भांडणही पाहायला मिळत आहे. अश्यातच बोताड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बेकायदेशीर दारु पिल्या १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यासोबतच आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धंधुका येथे सहा आणि बोताड रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला.
-
Gujarat | Four people dead after drinking spurious liquor in Dhandhuka, six people have been shifted to Ahmedabad for further treatment: Dr Sanket, Medical Officer Dhandhuka pic.twitter.com/8I6wt2FNYI
— ANI (@ANI) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gujarat | Four people dead after drinking spurious liquor in Dhandhuka, six people have been shifted to Ahmedabad for further treatment: Dr Sanket, Medical Officer Dhandhuka pic.twitter.com/8I6wt2FNYI
— ANI (@ANI) July 25, 2022Gujarat | Four people dead after drinking spurious liquor in Dhandhuka, six people have been shifted to Ahmedabad for further treatment: Dr Sanket, Medical Officer Dhandhuka pic.twitter.com/8I6wt2FNYI
— ANI (@ANI) July 25, 2022
आताच हाती आलेल्या माहितीनुसार, धंधुकामध्ये बनावट दारू प्यायल्याने चार जणांचा मृत्यू आहे. तर सहा जणांना पुढील उपचारासाठी अहमदाबादला हलवण्यात आले अशी माहिती डॉ. संकेत, वैद्यकीय अधिकारी धंधुका यांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, बोटाड जिल्ह्यातील रोजीद गावात अवैध दारूचे सेवन केल्याने सुमारे 10 लोक आजारी पडले. एकूण 10 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. मात्र, रोजिद येथील घटनेनंतर भावनगरहून सर टी हॉस्पिटलचे पथकही पाठवण्यात आले आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.