ETV Bharat / bharat

Posters Against PM Modi : पंतप्रधान मोदींच्या विरोधात लावले पोस्टर्स, ८ जणांना पोलिसांकडून अटक - पीएम मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा

गुजरातमध्ये अहमदाबाद शहरातील विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर लावण्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

8 arrested for putting up objectionable slogans against PM Modi in Ahmedabad
पंतप्रधान मोदींच्या विरोधात लावले पोस्टर्स, ८ जणांना पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Mar 31, 2023, 3:41 PM IST

अहमदाबाद (गुजरात) : गुजरातमधील अहमदाबादमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी मालमत्तांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात 'आक्षेपार्ह घोषणा' असलेले पोस्टर्स लावल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अहमदाबाद क्राइम ब्रँचने गुरुवारी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 30 मार्च रोजी 'मोदी हटाओ देश बचाओ' अशा घोषणा असलेले पोस्टर्स शहरभर अनधिकृत पद्धतीने लावण्यात आले होते.

या व्यक्तींना झाली अटक : बेकायदेशीरपणे पोस्टर लावल्याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नटवरभाई पोपटभाई, जतीनभाई चंद्रकांतभाई पटेल, कुलदीप शरदकुमार भट्ट, बिपिन रवींद्रभाई शर्मा, अजय सुरेशभाई चौहान, अरविंद गोर्जीभाई चौहान, जीवनभाई वासुभाई माहेश्वरी आणि परेश वासुदेवभाई तुलसिया अशी पोलिसांनी त्यांची नावे आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना गुजरात आम आदमी पार्टीचे अध्यक्ष इसुदान गढवी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

पकडलेले आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते: ते म्हणाले की, जे लोक आरोपी म्हणून पकडले गेले आहेत ते आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांच्या या कृतीतून भाजप घाबरल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. याबाबत ट्विट करून गढवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भाजपची हुकूमशाही बघा! त्यांनी लिहिले की, राजकीय आरोपांसह पोस्टर लावल्याबद्दल राज्यातील आप कार्यकर्त्यांना आयपीसीच्या विविध कलमांखाली तुरुंगात टाकण्यात आले आहे.

सर्व भाषांमध्ये लावलेत पोस्टर्स: ते म्हणाले की, भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते लढत राहतील. दरम्यान, 'मोदी हटाओ, देश बचाओ' अशा घोषणा देत आम आदमी पक्षाने (आप) 22 राज्यांमध्ये देशव्यापी पोस्टर मोहीम सुरू केली. गुरुवारी आपचे राज्य संयोजक गोपाल राय म्हणाले की, शिक्षण-आरोग्य व्यवस्था निश्चित करण्याऐवजी आणि बेरोजगारी दूर करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात गुंतले आहेत. देशभरातील २२ राज्यांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि इतर सर्व प्रादेशिक भाषांमध्ये पोस्टर्स लावण्यात येत आहेत.

हेही वाचा: मोदींनी ब्रिटिशांनाही मागे टाकले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.