ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, शहीद उधम सिंह यांची शौर्यगाथा! - स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या

भारतीयांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश राजवटीविरोधात रणशिंग फुंकत आपल्या केवळ नावानेच ब्रिटिशांना बुचकळ्यात टाकणाऱ्या एका थोर स्वातंत्र्य सेनानीची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. या स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे. शहीद सरदार उधम सिंह. त्यांनी धारण केलेल्या राम मोहम्मद सिंह आझाद या नावामुळे ब्रिटिश घाबरून गेले होते. काय आहे याची कहाणी जाणून घ्या..

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, शहीद उधम सिंह यांची शौर्यगाथा!

author img

By

Published : Nov 21, 2021, 6:03 AM IST

चंदिगड : भारतीयांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश राजवटीविरोधात रणशिंग फुंकत आपल्या केवळ नावानेच ब्रिटिशांना बुचकळ्यात टाकणाऱ्या एका थोर स्वातंत्र्य सेनानीची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. या स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे. शहीद सरदार उधम सिंह. त्यांनी धारण केलेल्या राम मोहम्मद सिंह आझाद या नावामुळे ब्रिटिश घाबरून गेले होते. काय आहे याची कहाणी जाणून घ्या..

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, शहीद उधम सिंह यांची शौर्यगाथा!

नावामुळे ब्रिटिशही घाबरले

हा तो काळ होता, जेव्हा संपूर्ण देशात ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरोधात क्रांतीचे वातावरण होते. संपूर्ण स्वातंत्र्य हीच एकमेव मागणी तेव्हा देशात होती. देशाला स्वातंत्र्य कधी मिळणार याचीच प्रत्येकाला चिंता होती. या परिस्थितीत एक नाव समोर आले, ते म्हणजे राम मोहम्मद सिंह आझाद यांचे. देशाला स्वातंत्र्य मिळावे याच एकमेव ध्येयाने झपाटलेल्या एका स्वातंत्र्यसेनानीने हे नाव धारण केले होते. भारतीयांना स्वतःच्याच देशात गुलामीची वागणूक देणाऱ्या ब्रिटिशांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याच्या ध्येयाने त्यांनी हे नाव धारण केले होते. देशवासियांना एकतेचा संदेश देण्यासोबतच ब्रिटिशांनाही संभ्रमात टाकणे अशी दोन उद्दीष्ट्ये त्यांनी या नावातून साध्य केली. या नावातच इतके सामर्थ्य होते की, आधी त्यांना संपवावे की त्यांचे नाव मिटवावे हे ठरविण्यातही ब्रिटिश असमर्थ ठरले. ब्रिटिशांनी त्यांचे नाव मिटविले नसते तर देशासमोर एक आदर्श उभा राहिला असता आणि ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नितीला मोठा धक्का पोहोचला असता. म्हणून ब्रिटिशांनी आधी त्यांचे नाव मिटविले आणि नंतर या क्रांतीकारकाला फासावर चढविले.

तीन धर्मांचा संगम

या नावात देशातील प्रमुख तीन धर्मांचा सुरेख संगम साधला होता. राम मोहम्मद सिंह आझाद, हिंदू धर्मातील राम, मुस्लिम धर्मातील मोहम्मद आणि शीख धर्मातील सिंह आणि आझाद म्हणजे मुक्त असे हे एकता आणि स्वातंत्र्याचा संदेश देणारे नाव होते.

शहीद-ए-आझम उधम सिंह

ज्या नावामुळे ब्रिटिशांना भितीने घाम फुटला होता, ते नाव धारण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी होते शहीद-ए-आझम उधम सिंह. जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ते थेट इंग्लंडला गेले होते. राम मोहम्मद सिंह आझाद हे नाव धारण करून त्यांनी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये मायकल ओड्वेयरवर उघडपणे गोळ्या झाडल्या. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या नावामुळे ब्रिटिश अतिशय अडचणीत सापडले. आपल्या नावामुळे ब्रिटिशांना अडचणीत आणणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानीचा जन्म 26 डिसेंबर 1899 रोजी संगरूरमधील सुनाम इथे झाला. त्यांचे जन्म नाव हे शेरसिंह होते. शहीद उधम सिंह यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांचे वडिल हे सतत आजारी असायचे. त्यामुळे त्यांचे काका चंचल सिंह यांनी त्यांना सुनामहून अमृतसरमधील अनाथाश्रमात आणल्याचे स्थानिक रहिवासी बरखा सिंह यांनी सांगितले.

जालियानवाला बाग हत्यांकाड बघितले

त्यानंतर अमृतसरमधील अनाथाश्रमात त्यांना उधम सिंह हे नाव मिळाले. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचे भाऊ साधू सिंह यांचा मृत्यू झाला. वयाच्या 19 व्या वर्षी जालियानवाला बाग हत्याकांडात ब्रिटिशांचा क्रूर चेहरा आणि निर्दयीपणा त्यांनी बघितला. या ठिकाणी उधम सिंह पाणी वाटपाची सेवा देत होते. तेव्हाच अचानक गोळीबार सुरू झाला. त्या वेळी उधम सिंह एका झाडामागे लपले. हे निर्दयी हत्याकांड बघितल्यानंतर उधम सिंह यांनी तत्काळ ब्रिटिशांचा बदला घेण्याची शपथ घेतली.

बदला घेण्यासाठी गाठले लंडन

जनरल डायरचा आधीच मृत्यू झाला होता. डायरचा भारतात मृत्यू झाला होता, मात्र गोळीबाराचा आदेश देणारा ओ ड्वेर इंग्लंडमध्ये निघून गेला होता. यासाठी उधम सिंह सातत्याने इंग्लंडला जाण्याच्या प्रयत्नात होते. सर्वात आधी ते दक्षिण आफ्रिकेला गेले आणि तिथून त्यांनी इंग्लंड गाठले आणि नंतर अमेरिका. तिथेच ते बॉम्ब बनविणे शिकले. पिस्तूल हाताळणेही ते तिथेच शिकले असे प्राध्यापक प्रशांत गौरव यांनी सांगितले. लंडनमध्ये वेगवेगळी कामे करत असताना उधम सिंह त्यांनी त्यांच्या मूळ ध्येयाचा कधीही विसर पडू दिला नाही. ड्वेरचा शोध त्यांनी सुरूच ठेवला. लंडनला गेल्यानंतर छोटी-मोठी कामे करत ते भूमिगत राहिले. कारपेंटर, इलेक्ट्रिशियन अशी अनेक कामे ते करत होते. यासोबतच त्यांचा ड्वेरचा शोधही सुरूच होता. गदर पार्टीसोबतही त्यांचे संबंध यावेळी निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवासी गुरचरण सिंह यांनी सांगितले.

भगत सिंहांच्या आदेशावरून पंजाबमध्ये परतले

1927 मध्ये भगत सिंह यांच्या आदेशावरून ते पंजाबमध्ये परतले. यावेळी त्यांना गदर कि गूंजची पत्रके वाटणे आणि शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात मुल्तानमध्ये अटक झाली. 1931 पर्यंत ते कारावासात राहिले. तुरुंगातून सुटकेनंतर ब्रिटिश सतत त्यांच्यावर पाळत ठेवून होते. मात्र त्यांनी ब्रिटिशांना हुलकावणी देत काश्मीरला आणि नंतर 1934 मध्ये तिथून इंग्लंडमध्ये जाण्यात यश मिळविले. अनेक ठिकाणी भटकंती केल्यानंतर अखेर ते लंडनला पोहोचले. आधी ते रशियाला गेले. नंतर इजिप्त, फ्रान्स, इथोपिया, जर्मनी आणि नंतर लंडनला ते पोहोचले. त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्यांच्या योजनेवर काम सुरू केल्याचे प्राध्यापक प्रशांत गौरव यांनी सांगितले.

अन् ड्वेरचा पत्ता सापडला

एक दिवस त्यांना एक पत्रक दिसले. त्यात मायकल ओ ड्वेर ईस्ट इंडिया असोसिएशनच्या एका समारंभात 13 मार्च 1940 रोजी भाषण देणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे बघताच त्यांनी त्यांच्या योजनेसाठीची तयारी सुरू केली आणि ठरलेल्या तारखेला ते कॅक्सटन हॉलला पोहोचले. उधम सिंह त्या हॉलमध्ये पोहोचले. त्यांनी एका पुस्तकात पिस्तुल लपविले होते. शेवटच्या ओळीत ते बसले होते. कार्यक्रमादरम्यान ते सातत्याने आपली जागा बदलत होते. अखेर जेव्हा मायकल ओ ड्वेरचे भाषण सुरू होणार होते तोपर्यंत ते पहिल्या ओळीत जाऊन बसले. जेव्हा ओ ड्वेर भाषणासाठी स्टेजवर आला तेव्हा उधम सिंह यांनी तत्काळ त्याच्यावर गोळीबार केला. ओ ड्वेरचा जागेवरच मृत्यू झाल्याचे प्राध्यापक प्रशांत गौरव यांनी सांगितले.

ब्रिटिश आले अडचणीत

मायकल ओ ड्वेरचा जागेवरच मृत्यू झाला, पण या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राम मोहम्मद सिंह आझाद या नावाने ब्रिटिश मात्र चांगलेच अडचणीत सापडले. शहीद उधम सिंह यांनी जे नाव धारण करून मायकल ओ ड्वेरवर गोळ्या झाडल्या, ते नाव होते राम मोहम्मद सिंह आझाद. माझ्याकडे त्यांचे हस्तलिखित पत्र आहे. या नामामुळे ब्रिटिश चांगलेच घाबरून गेले होते. त्यांनी त्यांना हे नाव त्यागण्यास सांगितले होते. ज्या उधम सिंह यांनी ब्रिटिशांना त्यांच्याच घरात जाऊन एकतेचा संदेश दिला. ब्रिटिश यामुळे चांगलेच घाबरले होते. त्यांना आपण कधीही सलाम केला नाही अशी खंत भगत सिंह यांचे भाचे जगमोहन सिंह यांनी बोलुन दाखविली.

1940 मध्ये फाशी

31 जुलै 1940 रोजी लंडनमधील पॅटोनविले तुरुंगात भारताच्या या महान सुपूत्रास फाशी देण्यात आली. त्यांचा मृतदेह जेलमध्येच दफन करण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री गियानी जैल सिंह यांच्या प्रयत्नांतून 31 जुलै 1974 मध्ये इंग्लंड सरकारने उधम सिंह यांचे मृतावशेष भारताला सुपूर्द केले. त्यांच्या मृतावशेषांवर सुनाममधील स्टेडियममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आणि सुनाम महाविद्यालयात कलशाची स्थापना करण्यात आली. येथील ग्रंथालयात हा कलश आहे. विद्यार्थी या कलशाला नमन करतात आणि या महान स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याने प्रेरित होतात असे शहीद उधम सिंह महाविद्यालय प्राध्यापक अश्वनी गोयल यांनी सांगितले.

ब्रिटिशांच्या भूमीवर भारतीय ध्वज सन्मानाने फडकाविणाऱ्या शहीद उधम सिंह सुरमा यांना ईटीव्ही भारतचा सलाम...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.