सूरत (गुजरात) - गुजरातमध्ये सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. या दरम्यान सुरत शहरात महिधरपुरा पोलिस ठाण्याजवळ तैनात असलेल्या एसएसटी पथकाने एका इनोव्हा कार मधून 75 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. (75 lakh cash found in car). आश्चर्याचे म्हणजे गाडीवर राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे व्हीआयपी पार्किंगचे स्टिकर आहे असून कार महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. कारचा पासिंग क्रमांक MH 04 ES 9907 हा आहे. (75 lakh cash found in car from Maharashtra).
कारमध्ये काँग्रेसचे प्रचार साहित्य सापडले - इनोव्हा कारमध्ये तपासादरम्यान काँग्रेसच्या निवडणुकीच्या साहित्याचे पॅम्प्लेट सापडले आहेत. तसचे राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे व्हीआयपी कार पार्किंगचे स्टिकरही सापडले असून त्यावर अधिकृत स्वाक्षरी देखील दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये काँग्रेसचे प्रचार साहित्यही सापडले आहे. गाडीमध्ये लाखोंची रोकड मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांकडून विविध चेकपोस्ट उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे राज्याच्या सर्व सीमांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.