पुणे - काही करण्याची मनापासून इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते. असेच काहीसे ७० वर्षीय सेवानिवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली (Colonel Girija Shankar Mungali) यांनी करून दाखवले आहे. कर्नल मुंगली यांनी वयाच्या 70 व्या वर्षी 1600 फुटांवरून पॅरा जंपिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (70 year old colonel para jumping). डॉ. गिरिजा मुंगली हे मूळचे नैनितालचे रहिवासी आहेत. मात्र, ते सध्या आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील पुणे येथे वास्तव्यास आहेत. (para jumping from 1600 feet).
16000 फूट उंचीवरून पॅराजंप - हवाई दलाच्या पॅराशूट ब्रिगेड फेस्टिव्हलच्या रीयुनियन-2022 दरम्यान, त्यांनी हवाई दलाच्या प्रशिक्षण विमानातून इतर 35 लोकांसह 16000 फूट उंचीवरून पॅराजंप केले. ते संघातील सर्वात वयस्कर सदस्य होते. त्यांनी सांगितले की, विमानातून उडी मारल्यानंतर जमिनीवर सुरक्षितपणे उतरण्यात खूप धोका असतो. तुमचे पॅराशूट पूर्णपणे उघडेपर्यंत सर्व काही ठीक झाले असे मानता येत नाही.
लष्कराच्या साहसी विभागाचे प्रमुख होते - डॉ. गिरिजा शंकर मुंगली यांच्या या अप्रतिम पराक्रमानंतर नैनितालमधील त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय सैन्यात मुंगली हे लष्कराच्या साहसी विभागाचे प्रमुख होते. सैन्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावून मिशन पूर्ण केले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्त राफ्टिंग मोहिमेत त्यांचा सहभाग होता. सैन्यात असताना साहस विभागाचे प्रमुख असल्याने त्यांनी हिमालयातील अनेक उंच शिखरे सर केली आहेत. मुंगली सध्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या टास्क फोर्सचेही सदस्य आहेत.