बंगळुरू - देशात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. या महासाथीमध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमवलंय. या काळात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. कर्नाटकाच्या हजारीबागमध्ये एकाच कुटुंबातील 6 लोकांचा गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि हात धुणे यासारख्या नागरिकांच्या सवयींमध्ये घट दिसून येते. बेजबाबदारपणामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सध्या कर्नाटकात 5 लाख 14 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 18 लाख 29 हजार 276 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24 हजार 207 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
कोरोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. आज भारतात कोरोनाच्या 2,57,299 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,62,89,290 एवढी आहे. देशात गेल्या २४ तासांत 4,194 नवीन मृत्यू झाले असून, आतापर्यंत मृतांची संख्या 2,95,525 वर गेली आहे. 3,57,630 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 2,30,70,365 नागरिकांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 29,23,400 आहे.