ETV Bharat / bharat

Faridabad Road Accident : भीषण अपघातात 6 तरुणांचा जागीच मृत्यू, कारचा झाला चक्काचूर! - अपघातात 6 तरुणांचा मृत्यू

फरिदाबादमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 तरुणांचा मृत्यू झाला. गुरुग्राममध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करून हे सर्व तरुण परतत होते. मृतांचे वय 24 ते 30 वर्षे आहे.

Faridabad Road Accident
फरिदाबादमध्ये अपघात
author img

By

Published : Mar 3, 2023, 11:53 AM IST

फरीदाबाद (हरियाणा) : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 6 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की कोणालाही गाडीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघातात प्राण गमावलेले सर्व लोक पलवल जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहांचे शवविच्छेदन : पोलिस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी फरिदाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. पलवल जिल्ह्यातील रहिवासी पुनीत, जतिन, आकाश, संदीप, बलजीत आणि विशाल हे अल्टो कारमध्ये बसून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुडगावला गेले होते. वाढदिवस साजरा करून सर्वजण रात्री उशिरा परतत होते. गुरुग्राम - फरीदाबाद रस्त्यावरील पाली गावाजवळ पोहोचल्यावर त्यांची कार एका डंपरला धडकली.

सर्व युवकांचा मृत्यू : ही धडक इतकी भीषण होती की धडकेत अल्टो कारचा चक्काचूर झाला. धडकेनंतर कारचे तुकडे सर्वत्र उडून विखरल्या गेले. या धडकेत 6 तरुणांपैकी एकालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या सर्व युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व मृतांचे वय 24 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे. या प्रकरणी पोलीस सध्या कायदेशीर कारवाई करत आहेत. हरियाणात शुक्रवारची सकाळ अत्यंत अशुभ ठरली आहे. शुक्रवारीच दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी पानिपतमध्येही एक रस्ता अपघात झाला होता ज्यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता तर 16 जण जखमी झाले होते. पानिपतमधील चुलकाना धाम येथून भाविक परतत असताना एका ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली होती.

मुंबईत बसची टेम्पोला धडक : मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लक्झरी बसने टेम्पोला धडक दिली. या धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बस चालक घटनास्थाळाहून फरार झाला आहे. ही लक्झरी बस मर्सिडीज बेंझ या महागड्या कंपनीची आहे. सुदैवाने धडकेत बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. वाकोला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे.

हेही वाचा : Mumbai Road Accident: मुंबईत हायवेवर टेम्पो आणि बसचा अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.