गुरुग्राम : सेक्टर-111 गुरुग्राममध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. तलावात पोहण्यासाठी गेलेले ( Children Drown In Gurugram Pond ) सुमारे अर्धा डझन मुले बुडाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम, अग्निशमन दल, नागरी संरक्षण, गुरुग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तलावातून आतापर्यंत एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. गुरुग्राममध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. गुरुग्राम सेक्टर-111 मध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. येथील गुरुग्राम पावसाळी नाल्याला पूर आल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. आज रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अर्धा डजनपेक्षा मुले पोहण्यासाठी पोहचली होती.
स्थानिक रहिवाशांनी मुले बुडताना पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तलावाच्या बाहेर सुमारे 6 मुलांचे कपडे पडलेले दिसले, मात्र मुले कुठेच दिसली नाहीत. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. सध्या एनडीआरएफची टीम, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, गुरुग्राम पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. मुलांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.