ETV Bharat / bharat

Students Teacher Died : पोहण्यासाठी गेलेल्या 5 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा तलावात बुडून मृत्यू - मेडचलमध्ये पाण्यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

एरागुंटा तलावात पोहताना सहा जणांचा मृत्यू झाला (Students Teacher died Falling Pond) आहे. मृतांमध्ये ५ मदरशाचे विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. तेलंगाणा राज्यातील मेडचल जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. जवाहरनगर अंतर्गत मलकापुरम येथील एका तलावात हे सर्वजण पोहण्यासाठी गेले होते.

file photo
file photo
author img

By

Published : Nov 5, 2022, 4:56 PM IST

मेडचल (तेलंगाणा) - एरागुंटा तलावात पोहताना सहा जणांचा मृत्यू झाला (Students Teacher died Falling Pond) आहे. मृतांमध्ये ५ मदरशाचे विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. तेलंगाणा राज्यातील मेडचल जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. जवाहरनगर अंतर्गत मलकापुरम येथील एका तलावात हे सर्वजण पोहण्यासाठी गेले होते. या घटनेनंतर परिसरात शोककला पसरली आहे. हे सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असून, ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले (Telangana News) आहेत.

वाचवायला गेलेल्या शिक्षकाचाही मृत्यू - हे सर्व विद्यार्थी तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्या तलावात पाणी खोल असल्याने विद्यार्थ्यांना याचा अंदाज आला नाही. हे पाच विद्यार्थी एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. हे विद्यार्थी पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तेथील शिक्षकाने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्या शिक्षकालाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

मृतदेह पाण्यातून काढले बाहेर - दरम्यान, हे सर्वजण अंबरपेठ येथील मदरशातील विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. तलावात पोहायला गेलेल्या पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचाही बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी 12 ते 14 वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.