हैदराबाद - करीमनगर जिल्ह्यातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात 42 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ( 42 medical Students corona positive in Hyderabad ) झाली आहे. कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर काही डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांच्या कोविड चाचण्या घेतल्या. यापैकी ४२ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आणि काहींचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे.
कार्यक्रमात कोणीही मास्क घातला नाही -
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कोणीही मास्क घातलेले दिसून आले नाही. या घटनेने कोरोना पसरल्याचा अनेकांना संशय आहे.
कॉलेजला सुट्टी जाहीर -
महाविद्यालयात कोविड प्रकरणे आढळल्याने व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर केली. व्यवस्थापनाने सांगितले की ज्यांना पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यापैकी कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत, असे प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा - Woman Suicide for blouse : पतीने आवडीनुसार ब्लाउज न शिवल्याने पत्नीची आत्महत्या