सीकर- गुरुवारी सकाळी राजस्थानमध्ये सीकर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाणे परिसरात भीषण अपघात झाला. यामध्ये 3 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड भागातील मेनस गावचे रहिवासी होते. गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड परिसरातील मेनस गावचे एकाच कुटुंबातील 5 लोक कारने निघाले. हे नागौरच्या जयल भागात जात होते. सीकर सोडल्यानंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसार बडी गावाजवळ त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या टँकरला धडक बसली. ही टक्कर इतकी भयानक होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परिसरातील लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांना कारच्या बाहेर काढले. पण त्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 52 वर्षे वयाचे भिकाराम यादव आणि त्यांची पत्नी श्याना देवी, गीता सुनील यादव आणि ग्यारसी संवर्मल यादव यांचा समावेश आहे. हे मानस गावचे रहिवासी आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महेंद्र यादवला जयपूर येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा- गंगा नदीत बोट उलटली : ३० जणांना वाचवण्यात यश, ५० हून अधिक बेपत्ता
हेही वाचा- महाराष्ट्र पोलिसांची वाळू तस्करांवर कारवाई, वाळूचे 35 डंपर ताब्यात