नवी दिल्ली : जागतिक अनिश्चितता आणि मोठ्या प्रमाणात असलेली आर्थिक मंदी दरम्यान, भारतातील 5 पैकी 4 व्यक्ती 2023 मध्ये नवीन नोकरीच्या शोधात आहेत. बुधवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. लिंक्डइनच्या अहवालानुसार, 18-24 वयोगटातील 88 टक्के नोकरदार, 45-54 वयोगटातील 64 टक्के नोकरदार नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. पुढे अनिश्चित आर्थिक काळ असूनही, नोकर वर्ग त्यांच्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत. प्रगतीच्या संधीचा शोध घेऊन, नागरीक लॉन्ग-टर्म दृष्टीकोनाचा मार्ग अवलंबित आहे.
भारतीयांचा स्वत:वर विश्वास : सर्वेक्षण केलेल्या तीन चतुर्थांश (78 टक्के) कर्मचार्यांनी सांगितले की, जर त्यांनी त्यांची नोकरी सोडली तर, त्यांना अर्ज करण्यासाठी इतर संधी शोधण्यात आत्मविश्वास वाटेल. लिंक्डइन करिअर एक्सपर्ट नीरजिता बॅनर्जी म्हणाल्या की, 'कठीण आर्थिक परिस्थिती असूनही, भारतीय कर्मचार्यांचा विकास आणि पुढे जाण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. तर व्यावसायिकांनी हस्तांतरणीय कौशल्ये तयार करून स्वत:मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जे त्यांचे प्रोफाइल अधिक बहुमुखी आणि विविध भूमिकांसाठी अनुकूल बनवेल.'
44 टक्के लोक शिकत आहेत कौशल्ये : तीनपैकी एकाने (32 टक्के लोकांनी) सांगितले की, त्यांना त्यांच्या क्षमतेवर अधिक विश्वास आहे आणि त्यांना वाटते की त्यांना आणखी चांगली भूमिका-संधी मिळाली असती. लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्सनुसार, भारतातील पाचपैकी फक्त दोन (43 टक्के)कर्मचारी आर्थिक मंदीसाठी तयार आहेत. तथापि, सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे कर्मचारी स्वतः 'करिअर कुशन' करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करत आहेत. भारतातील अर्ध्याहून अधिक (54 टक्के) नोकरदार योग्य लोकांच्या संपर्कात राहून आणि अधिक नोकरदार कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे नेटवर्क वाढवत आहेत. याव्यतिरिक्त, 44 टक्के लोक आज नवीन इन-डिमांड आणि हस्तांतरणीय कौशल्ये शिकत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
लिंक्डइन : आजच्या काळात ज्याप्रमाणात कौशल्य शिकविणारे ट्रेनिंग सेंटर उभारल्या गेले आहे. त्याप्रमाणात रोजगार उपलब्ध नाही. भारतातील अनेक युवक वेगवेगळ्या क्षेत्रात संधी शोधत आहेत. प्रत्येकाला सद्यस्थितीपेक्षा अधिक पाहिजे आहे. त्यामुळे दररोज करोडो युवक लिंक्डइन वर जॉब शोधत असतात.