राणीपेट (तामिळनाडू) - मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमात भाविक दंग झाले असतानाच अचानक क्रेन कोसळून 4 भाविकांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना किलावती गावात 22 जानेवारीला घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोंगलनंतर आठ दिवसांनी मयीलेरू हा उत्सव द्रोपदी अम्मन आणि मोंडी अम्मन येथील मंदिरात साजरा करण्यात येतो. मात्र चार भाविकांचा मृत्यू झाल्याने यावेळी या उत्सवाला गालबोट लागले आहे.
हार टाकतानाच क्रेन कोसळल्याने झाला मृत्यू : रात्रीच्या वेळी भाविक पूर्ण श्रद्धेने पूजा करण्यात मग्न होते. यावेळी काही भाविक क्रेनने देवाला हार टाकत होते साडेआठच्या सुमारास अचानक क्रेन खाली कोसळली. त्यामुळे 3 भाविक क्रेनखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात भुबलान ( वय 40 ) ज्योतीभाऊ ( वय 16) मुथ्थूकुमार ( 39) यांचा समावेश आहे. तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी धावपळ झाली. यावेळी नातेवाईंनी मोठा आक्रोश केला.
गंभीर जखमीचा रुग्णालयात मृत्यू : देवाला हार ठाकत असताना क्रेन कोसळून अपघात झाला. या अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर थुरुवल्लूर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील चिन्नास्वामी ( वय 85 ) यांचा दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे चांगलीच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सहा भाविकांवर सुरू आहेत उपचार : मंदिरात क्रेनचा अपघात झाल्यामुळे चार भाविकांचा मृत्यू झाला. तर तब्बल सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जखमी भाविकांवर थुरुवल्लूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात सुर्या ( वय 22 ) गजेंद्रन ( वय 25 ) हेमंत कुमार ( वय 16 ) अरुणकुमार ( वय 25 ) काथिरवन ( वय 23 ) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
क्रेनचालकाच्या आवळल्या मुसक्या : मयीलेरू येथील मंदिरात सुरू असलेल्या उत्सवात क्रेन पडून अपघात घडला. या अपघातात चार भाविकांनी आपला प्राण गमावला आहे. यातील जखमींवर थुरुवल्लूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी भाविकांवर चेन्नईतील रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी नेमाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी क्रेनचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली आहे. यावेळी या क्रेनला परवानगी देण्यात आली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेतील व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
हेही वाचा - Man Killed Wife Two Kids : नराधम पतीने पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करुन दारातच पुरले, दोन महिन्यानंतर बाहेर काढले मृतदेह