ETV Bharat / bharat

अलिगड विषारी दारू प्रकरण : मृतांचा आकडा ३५ वर ; चार दुकाने सील करत तिघांना अटक

उत्तरप्रदेश मधील अलिगढ जिल्ह्यात विषारी दारू पिल्यामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी संध्याकाळी सुरू झालेला हा सिलसिला अजूनही थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. यात अंडला येथील एचपी बॉटलिंग प्लांटवरील टॅक्टर चालकांचाही समावेश आहे. तर ही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या १४ जणांची परिस्थिती गंभीर आहे.

35 people died due to drinking poisonous liquor in aligarh
अलिगढमध्ये विषारी दारू पिल्यामुळे ३५ जणांचा मृत्यू
author img

By

Published : May 29, 2021, 1:18 PM IST

अलिगड - उत्तरप्रदेश मधील अलिग़ड जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) पिल्यामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील गॅस बाटलिंग प्लांटचे चालक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेतील १४ जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर जेएन मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेला हा सिलसिला अजूनही थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. यात अंडला येथील एचपी बॉटलिंग प्लांटवरील टॅक्टर चालकासह ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या १४ जणांची परिस्थिती गंभीर आहे. अलिगढ जिल्ह्यातील ठाना लोधा, खैर, जवां, टप्पल, पिसावा या भागातील नागरिकांनी ही विषारू दारू खरेदी केलेली आहे. विषारू दारू पिल्यामुळे मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये लोधा परिसरातील करसुआ, निमाना, अंडला और हेवतपुर गावांचा समावेश आहे. काही लोक हे अद्यापही बिमार आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अवहाल मागवला -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची माहिती घेतली असून आरोपीवर सक्त कारवाई करत एनएसए व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिली आहेत. आतापर्यंत ४ सरकारी दारू विक्री केंद्रे सील करण्यात आले आहे. तर याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. १५ दिवसात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी डीपी पाल यांच्याकडून चौकशी अवहाल मागवला आहे.

फरार मुख्य आरोपीवर ५० हजारांचे पारितोषिक -

याप्रकरणी आतापर्यंत ठाना लोधा, खैर आणि जवा येथे तीन गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. तर १२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दारू व्यावसायिक अनिल चौधरी, ठेकेदार नरेंद्र, विक्रेता अजय यांना अटक करण्यात आली आहे. तर फरार मुख्य आरोपी दारू व्यावसायिक विपिन यादव आणि ऋषि शर्मा यांच्यावर ५० हजारांचे पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.

प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईचे मुख्यमंत्री योगींचे निर्देश-

अलिगडमध्ये दारूमुळे मृत्यू झाल्याच्या या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबकारी विभागाला चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. तसेच ही विषारी दारू सरकारमान्य दुकानातून विकली गेली असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री योगींनी दिल्या आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींची संपत्ती जप्त करून लिलावात काढा आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! विषारी दारू पिऊन अलिगडमध्ये 8 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.