श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात सुरक्षा दलांनी मंगळवारी 30 ते 35 किलो वजनाचा IED जप्त केला. जम्मू आणि पोलिसांनी सांगितले की, मध्य काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील खोनमोह भागातील फळबागांमध्ये 35-35 किलो IED जप्त केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या IED द्वारे मोठा स्फोट करण्याचा दहशतवादी गटांचा प्रयत्न होता.
काश्मीर पोलिस झोनने ट्विट केले आहे की, श्रीनगरच्या खानमोह भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर, पोलिस आणि 50RR यांनी संयुक्त कारवाई सुरू केली. फळबागांच्या परिसरात शोध घेत असताना, 30-35 किलो वजनाचा IED जप्त करण्यात आला. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आयईडी जागेवर नष्ट करण्यात येत आहे.