श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान येथे झालेल्या स्फोटात तीन सैनिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका खासगी वाहनात झाला. जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात गुरुवारी ( दि. 2 जून ) सकाळी एखा खासगी वाहनात झालेल्या स्फोटात तीन जवान जखमी झाले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, वाहनाच्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा स्फोट झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी वाहनातून 15 लष्करी जवान सिद्धू शोपियानला पोहोचले होते. त्याचा जोरदार स्फोट झाला ज्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले. जखमींना श्रीनगरमधील 92 बेस मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
स्फोट नेमका कशाचा होता. नेमका कशामुळे झाला. याबाबत चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत पुढील माहिती देण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण