ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : मुंबई महापालिकाचा अर्थसंकल्प आज सादर होणार; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Top News
Top News
author img

By

Published : Feb 3, 2022, 6:06 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • मुंबई महापालिकाचे अर्थसंकल्प आज सादर होणार

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज (गुरुवारी ३ फेब्रुवारीला) सादर केला जाणार आहे. मागील वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आज सादर होणारा सन २०२२ - २३ चा अर्थसंकल्प सुमारे ४१ हजार कोटींच्या दरम्यान असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर केला जाणार असून मुंबई महापालिकेच्या फेसबुक आणि युट्युबवर तो लाईव्ह पाहता येणार आहे.

  • अनिल देशमुख-परमबीर सिंग प्रकरण सुनावणी आज

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आयोगाच्या रजिस्ट्रार यांना एका आठवड्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यास सांगितले. आवश्यकतेनुसार संबंधित साक्षीदारांना परत बोलावण्याचा संबंधित पक्षांचा अधिकार खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाची आज (3 फेब्रुवारी) रोजी होणार आहे.

  • गेट परीक्षेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

देशात सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट (GATE) परीक्षा २०२२ पुढे ढकलण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरील सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ( आज) सहमती दर्शवली आहे.

  • राज्यातील काही जिल्ह्यात आज पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसापासून पश्चिमी चक्रवातामुळे गारठा वाढला आहे. मात्र येत्या २४ तासात महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी कमी होणार आहे. तर पंजाब, पश्चिम मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर मध्य या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शिवाय काही भागात आज गारपिट तर काही भागात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

  • शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा आज वाढदिवस

प्राध्यापिका ते महिला शिक्षण अशी मंत्री ओळख असलेल्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे. राजकीय क्षेत्रांत एक व्यक्तीमत्त्व म्हणून त्या परिचित आहेत.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले (Actor Ramesh Deo passed away) आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव (Ajikya Deo) यांनी दिली आहे. 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी चीन,पाकिस्तान, मेड इन इंडिया, रोजगार आदी मुद्यांवर भाष्य केले.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी डेहराडून ( Priyanka Gandhi in Uttarakhand ) दौऱ्यावर आहेत. उत्तराखंड निवडणुकीची तयारी सुरू झाल्यापासून उत्तराखंड काँग्रेस प्रियंका गांधींच्या दौऱ्याची वाट पाहत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रियंका गांधींचा दौरा नियोजित होता. परंतु वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तो दौरा पुढे ढकलावा लागला होता. आज प्रियंका गांधी डेहराडूनमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आज काँग्रेसचे 'उत्तराखंड स्वाभिमान प्रतिज्ञापत्र'ही त्यांच्या हस्ते जारी करण्यात आले. यावेळी ईटीव्ही भारतने प्रियांका गांधी यांच्याशी खास बातचीत ( Priyanka Gandhi's Exclusive Interview with ETV India ) केली.

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे हे कणकवली न्यायालयात आज शरण आले होते. नितेश राणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्ज आज मागे घेण्यात आला. त्यानंतर ते कणकवली न्यायालयात शरण आले होते. न्यायालयासमोर शरण आल्याने न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून म्हणणे मागवले. त्यानंतर राणेंचे वकील व सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी राणेंना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोंदिया : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टी झाली असली तरी, विदर्भातील सिंचन क्षेत्रात मात्र घट झाली ( Vidarbha Irrigation Area Reduced ) आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याचा विचार केला, तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गोंदिया जिल्यातील धरणांच्या पाणी साठ्यात कमी झाली आहे. गोंदियात ९ हजार ८५४ हेक्टर शेत जमिनीला पुरेल इतकाच पाणी साठा उपलब्ध असल्याने सिंचन क्षेत्रात घट झाली आहे. काय आहे गोंदिया जिल्ह्यातील पाणी परिस्थिती, पाहूया एक रिपोर्ट..

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाला भारतीय जनता पक्ष विरोध करत ( BJP Opposes Wine At Supermarket ) आहे. मात्र, दारू उत्पादन करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आहेत. त्या कारखान्यांचे परवाने भाजपाचे नेते रद्द करतील का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला ( Nawab Malik Criticized BJP ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.