नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा: दिल्लीत बलात्काराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. ताज्या घटनेत ग्रेटर नोएडामधील थाना बीटा 2 भागात राहणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवून ३ मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 5 महिने बलात्कार केला. हताश झालेल्या पीडितेने घरी आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र कुटुंबीयांनी तिला वाचवले. त्यानंतर विद्यार्थिनीने कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपी तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
प्रेमाचा बहाणा अन् नंतर ब्लॅकमेल: ग्रेटर नोएडा येथील इंटर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थिनीसोबत एका तरुणाने प्रेमाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले तसेच तिच्या भावाला व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर 5 महिने बलात्कार केला. यानंतर आरोपीने तो अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्रांनाही दिला, त्यानंतर दोघांनीही विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
इतर मित्रांसोबत शरीरसंबंधांसाठी दबाव: एवढेच नाही तर तिन्ही आरोपी पीडित विद्यार्थिनीवर तिच्या इतर मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. त्यामुळे मानसिक निराशेतून विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र घरात उपस्थित असलेल्या लहान बहिणीने यावेळी आरडाओरड केली. त्यावेळी घरातील इतर लोकांनी तात्काळ धाव घेत तिला आत्महत्या करत असताना पाहून वाचवले. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तिचा जीव वाचवला. नातेवाइकांनी विद्यार्थिनीला याचे कारण विचारले असता तिने तिचा संपूर्ण हकीकत सांगितली.
अनेकांकडून लैंगिक छळ: विद्यार्थिनीने सांगितले की, अनेक लोकांकडून तिचा लैंगिक छळ केला जात आहे, त्यामुळे ती खूप हताश आणि निराश झाली आहे, त्यामुळे तिला आत्महत्या करायची आहे. यानंतर पीडितेच्या आईने या प्रकरणाची तक्रार बीटा-2 पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ग्रेटर नोएडा झोनचे एडीसीपी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी आणि त्याच्या मित्रांचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.