ETV Bharat / bharat

UP Crime News : चोरीच्या आरोपावरून 23 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू - २३ वर्षीय तरुणीचा मारहाणीत मृत्यू

गाझियाबादमध्ये चोरीच्या आरोपावरून एका मुलीला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे.

UP Crime News
UP Crime News
author img

By

Published : Jun 21, 2023, 4:27 PM IST

गाझियाबाद पोलीस तपास करत आहेत.

नवी दिल्ली/गाझियाबाद : चोरीच्या आरोपावरून एका 23 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. मारहाणीत त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला : या आधी एका घरात भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे त्यांना एका मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. मृत तरुणीच्या बहिणीने सांगितले की, तिच्या बहिणीला चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

पोलिसांचा पुढील तपास सुरु : हे प्रकरण गाझियाबादच्या सिद्धार्थ विहार भागातील आहे. बुधवारी सकाळी पोलिसांना घरात भांडण झाल्याची माहिती मिळाली होती. तेथे मुलगी आल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिच्या येण्याच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनेच्या वेळी घटनास्थळी डीजे वाजत होता. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे एसीपी रवी प्रकाश यांनी सांगितले.

इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार : या प्रकरणी पोलिस इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. याशिवाय आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. यात घरमालकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर या प्रकरणी काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या प्रकरणातील अधिक माहिती वस्तुस्थितीच्या आधारे दिली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र प्रश्न असा उभा राहतो की, जर लोकांना तिच्याबद्दल शंका होती तर ते पोलिसांनाही कळवू शकले असते.

ओळख लपवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात तरुणाने आपली ओळख लपवून अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली आहे. तरुणाने आधी त्याचे नाव व धर्म लपवून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिला त्याचे खरे रुप कळताच तरुणाने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

हे ही वाचा :

  1. UP Crime News : इंस्टाग्रामवर तरुणीशी मैत्री करून केला बलात्कार, अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
  2. Mumbai Crime News: मेकअप आर्टिस्ट सारा यंथनचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?
  3. Mumbai Crime News: भयानक! लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रियकराने रिक्षात विवाहित प्रेयसीचा चिरला गळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.