ETV Bharat / bharat

राजौरीत घुसखोरी करणाऱ्या पाक दहशतवाद्यांचा खात्मा; 2 जवान हुतात्मा - सुंदरबनी सेक्टर चकमक

सुरक्षा दलाने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा कट उधळला. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा लष्काराने खात्मा केला. या चकमकीत दोन जवानही हुतात्मा झाले.

लष्कर
लष्कर
author img

By

Published : Jul 9, 2021, 9:40 AM IST

Updated : Jul 9, 2021, 12:25 PM IST

श्रीनगर - पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. सुरक्षा दलाने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा कट उधळला. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा लष्काराने खात्मा केला. या चकमकीत दोन जवानही हुतात्मा झाले. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात घुसखोरी व दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्याआधारे सैन्य दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती.

दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले. मात्र, यात दोन जवान हुतात्मा झाले. श्रीजीत एम आणि मारुप्रोलू जसवंत रेड्डी अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. दहशतवाद्यांकडून एके-47 रायफल आणि दारुगोळा जप्त केला आहे.

राजौरी भागात गेल्या 24 तासांत सैनिकांनी रोखलेली ही दुसरी घुसखोरी होती. राजौरी जिल्ह्यात बुधवारी नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या जवानांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला गोळ्या घातल्या. नियंत्रण रेखा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले.

गुरुवारी ४ दहशतवाद्यांना कंठस्नान -

जम्मूत दोन ठिकाणी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकी गुरुवारी कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात झाल्या. पहिली चकमक कुलगाम जिल्ह्यातील झोदार भागात तर दुसरी चकमक पुलवामा जिल्ह्यातील पुचल येथे झाली.

हेही वाचा - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या काय आहेत दर

Last Updated : Jul 9, 2021, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.