तिरुवनंतपुरम (केरळ) - कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या केरळला आणखी नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. झिका हा विषाणुजन्य रोग केरळमध्ये आढळला आहे. केरळमध्ये झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्याच्या सुरवातीला केरळमध्ये झिका विषाणूचे पहिला रुग्ण आढळला होता. डासांपासून पसरणाऱ्या या विषाणूसंदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरला आणि एका 16 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. एकूण 23 रुग्णांना झिका विषाणूची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी माहिती दिली.
ही आहेत लक्षणे -
- ताप आणि अंगावर लाल फोड येणे, स्न्यायू दुखणे, सांधे दुखी आणि डोके दुखी हे झिकाची लक्षणे आहेत.
- झिका हा एड्स या डासामुळे होतो. डास दिवसभरातून एकदाच मानवाला चावतो.
- रोगाची लक्षणे दोन ते सात दिवस राहतात.
- झिकाची लक्षणे दिसण्यासाठी तीन ते १४ दिवस लागतात. तर बहुतांश रुग्णांमध्ये झिकाची लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत.
- या विषाणुमुळे रोगी व्यक्तीचा क्वचित मृत्यू होतो.
हेही वाचा - कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन करा, अन्यथा तिसऱ्या लाटेला सामोरे जा- केंद्र सरकार
हेही वाचा - झिका विषाणूचा धोका वाढला; तिरुअनंतपुरममध्ये १६ वर्षीय मुलीसह अन्य तिघांना लागण