बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर) - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा भागात चकमकीत दोन अतिरेकी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी शुक्रवारी दिली. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने सोपोरच्या वारपोरा परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्याने सुरक्षा दलाने जवाबी कारवाई केली. या घटनेत कोणत्याही नागरिकाला हानी पोहचलेली नाही.
जम्मू-काश्मीरचे पोलीस आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, दोन अतिरेकी ठार झाले आहे. त्यातील एक लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इश्फाक दार उर्फ अबू अक्रम आहे. अक्रम हा 2017 पासून या भागात सक्रिय होता आणि बर्याच दहशतवादी घटनांमध्येही त्याचा सहभाग होता. यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोपियान जिल्ह्यातील सादिक खान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाची चकमकी सुरू केल्याची माहिती दिली. यावेळ. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 व आठ मॅगजिनही जप्त करण्यात आली आहेत. वास्तविक, रविवारी रात्री सुरक्षा दलांना शोपियानच्या सादिक खान भागात दहशतवादी लपून बसल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून कारवाई करण्यात आली.
2021 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 88 अतिरेकी ठार मारले आहेत. यातील एकट्या जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 16 जणांना कंठस्नान घातले. आतापर्यंत दहशतवाद संबंधित विविध घटनांमध्ये सुरक्षा दलातील 19 जवान हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात शांती प्रस्थापित करणं अवघड आहे. पाकिस्तान आणि फुटिरतावादी या दोन घटकांमुळे या भागात कायम तणाव राहिला आहे. खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात येत आहेत. मात्र, दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बऱ्याच दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणही केलं आहे.