ETV Bharat / bharat

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे उत्पादनात 2 लाख कोटींचे नुकसान : आरबीआय लेख - कोरोना

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे उत्पादनात 2 लाख कोटींचे नुकसान झाले आहे, असे आरबीआयच्या मासिकात म्हटलं आहे. सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी मासिकात हा लेख लिहला आहे.

आरबीआय
आरबीआय
author img

By

Published : Jun 18, 2021, 12:10 PM IST

मुंबई - रिझर्व्ह बॅकेच्या मासिक जर्नलमध्ये 'अर्थव्यवस्थेची स्थिती' या विषयावर सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी लेख प्रकाशित केला आहे. एप्रिल-मेमध्ये कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पादनाच्या बाबतीत देशाचे 2 लाख कोटींचे नुकसान झाले आहे, असे लेखात म्हटलं आहे. गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाउननंतर दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यस्तरावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम देशाअंतर्गत मागणीवर झाला. याशिवाय या लाटेचा परिणाम लहान शहरे व खेड्यांमध्येही झाला. ग्रामीण भागातील मागणीवर विपरित परिणाम झाल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे.

पुरवठा स्थितीशी संबंधित अनेक बाबतीत परिस्थिती चांगली आहे, असे लेखात म्हटले आहे. यामध्ये कृषी आणि संपर्क रहित सेवा समाविष्ट आहेत. या सेवांचे महामारीतही कार्य चांगल्याप्रकारे सुरू असून औद्योगिक उत्पादन आणि निर्यातीत वाढ झाली आहे. तसेच लसीकरणानंतर कोरोना लगेच संपणार नाही. आपल्याला कोरोनासोबत जगणे शिकावे लागेल. आरोग्य सेवा, लॉजिस्टिक्स आणि संशोधनात गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे, असेही लेखात म्हटलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.