नवी दिल्ली 19th Hangzhou Asian Games : अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना चीनमधील क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या चीनमधील सहभागात अडथळा निर्माण झाला आहे. चीननं अरुणाचल प्रदेशातील न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु या तीन महिला वुशू खेळाडूंना मान्यता नाकारली आहे. न्यामन वांगसू, ओनिलू तेगा, मेपुंग लामगु या तीन वुशू खेळाडूंना हँगझोऊ आशियाई खेळ आयोजन समितीकडून मान्यतापत्रे मिळाली नाहीत. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा चीनचा दावा असल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग : "चिनी अधिकाऱ्यांनी भारतीय खेळाडूंना चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेश नाकारून भेदभाव केला आहे. "परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनात ही माहिती दिली. “आमच्या भूमिकेच्या अनुषंगानं, भारत भारतीय नागरिकांशी अधिवास किंवा वांशिकतेवर आधारित भिन्न वागणूक नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तसंच तो अविभाज्य भाग राहील.”
चिनी अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा : आशियाई ऑलिम्पिक समितीचे अंतरिम अध्यक्षपद भूषवणारे रणधीर सिंग यांनी सांगितलं की, तिन्ही खेळाडूंची मान्यता नाकारण्याबाबत आपण चिनी अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा करत आहोत. भारताचा आठ सदस्यीय वुशू संघ शुक्रवारी चीनला रवाना होणार होता. मात्र, या तिन्ही खेळाडूंना भारतातच राहावं लागणार आहे. या समस्येनंतर आम्ही कार्यकारिणीची बैठक घेतलीय. या विषयावर सविस्तर चर्चा केली, असं रणधीर सिंग यांनी सांगितले.
आशियाई खेळाच्या नियमाचं उल्लंघन : क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही याप्रकरणी चीनचा निषेध केलाय. अरुणाचल प्रदेशचे लोकसभा खासदार किरेन रिजिजू यांनीही चीनच्या कृतीला फटकार लगावलीय. “हांगझोऊ येथे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार्या अरुणाचल प्रदेशातील आमच्या वुशू खेळाडूंना व्हिसा नाकारण्याच्या चीनच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. चीनचं कृत्य आशियाई खेळांचं संचालन करणाऱ्या नियमांचं उल्लंघन करतं, असं रिजिजू यांनी X वर पोस्ट केलीय.अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त प्रदेश नाही, तर भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचल प्रदेशातील जनता ही चीन करत असलेल्या दाव्याला विरोध करत आहे, असंही रिजिजू यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- ICC ODI World Cup 2023 Trophy : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीत क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी प्रदर्शित, पहा व्हिडिओ
- ICC World Cup Trophy : रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रदर्शित होणार आयसीसी विश्वचषक ट्रॉफी, जाणून घ्या ट्रॉफीबद्दल सर्वकाही
- ICC World Cup Anthem : क्रिकेट वर्ल्डकपचं अधिकृत अॅन्थम जारी, रणवीर सिंहनं केलाय धमाकेदार डान्स