ETV Bharat / bharat

New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार - नवी संसद इमारत

28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्याने यावरून राजकारण तापले आहे. अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

New Parliament Building
नवी संसद इमारत
author img

By

Published : May 24, 2023, 3:39 PM IST

नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा येथील नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावरून वाद वाढतोच आहे. या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने 28 मे रोजी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मंगळवारी टीएमसीने अशी घोषणा केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही समारंभावर बहिष्कार टाकला. बुधवारी, बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही ट्विट करून सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

  • 19 opposition parties issue a joint statement to boycott the inauguration of the new Parliament building on 28th May, saying "When the soul of democracy has been sucked out from the Parliament, we find no value in a new building." pic.twitter.com/7p7lk9CNqq

    — ANI (@ANI) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बहिष्काराची घोषणा करणारे पक्ष : इंडियन नॅशनल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, आम आदमी पार्टी, शिवसेना (यूबीटी), समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, राष्ट्रीय लोक दल, तृणमूल काँग्रेस, जनता दल (युनायटेड), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), राष्ट्रीय जनता दल, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम

  • Parliament is not just a new building; it is an establishment with old traditions, values, precedents and rules - it is the foundation of Indian democracy. PM Modi doesn’t get that

    For him, Sunday’s inauguration of the new building is all about I, ME, MYSELF. So count us out

    — Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्हे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. तृणमूल आणि आप या दोन्ही पक्षांनी हा भारताच्या राष्ट्रपतींचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यावर ट्विट केले.

संसद ही केवळ एक इमारत नाही, तर ती जुन्या परंपरा, मूल्ये, उदाहरणे आणि नियम असलेली संस्था आहे. ती भारतीय लोकशाहीचा पाया आहे. पंतप्रधान मोदींना हे कळत नाही. त्यांच्यासाठी रविवारी नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्याबद्दलचे आहे. म्हणूनच आम्ही त्यावर बहिष्कार टाकतो आहे. - डेरेक ओब्रायन, खासदार, तृणमूल कॉंग्रेस

  • संसद भवन के उदघाटन समारोह में महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मूर्मू जी को आमंत्रित न करना उनका घोर अपमान है।
    ये भारत के दलित आदिवासी व वंचित समाज का अपमान है।
    मोदी जी द्वारा महामहिम राष्ट्रपति को आमंत्रित नही करने के विरोध में @AamAadmiParty उदघाटन कार्यक्रम का बहिष्कार…

    — Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हा राष्ट्रपतींचा अपमान' : नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते न करणे हा त्यांचा अपमान असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. रविवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर पक्ष बहिष्कार टाकणार आहे. संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न करणे हा घोर अपमान असल्याचे आप नेते संजय सिंह यांनी ट्विट केले आहे. हा भारतातील दलित आदिवासी आणि वंचित समाजाचा अपमान आहे. राष्ट्रपतींना निमंत्रण न देणाऱ्या मोदींच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

  • It looks like the Modi Govt has ensured election of President of India from the Dalit and the Tribal communities only for electoral reasons.

    While Former President, Shri Kovind was not invited for the New Parliament foundation laying ceremony…

    1/4

    — Mallikarjun Kharge (@kharge) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॉंग्रेसचा सरकारवर आरोप : काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ऐवजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसदेच्या उद्घाटनावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी निमंत्रित न केल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर वारंवार अपमान केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही, असे काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी ट्विट केले.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut On Pm : राष्ट्रपतींना नव्या संसद भवनच्या उद्धाटनाला न बोलवणे हा देशाचा अपमान, विरोधी पक्ष करणार बहिष्कार - संजय राऊत
  2. PM Modi In Australia : पंतप्रधान मोदींचा सिडनीमध्ये गार्ड ऑफ ऑनरने सत्कार
  3. Amit Shah Statement On Central Vista : संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार, गृहमंत्री अमित शाहांनी ठणकावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.