आज दिवसभरात -
- आज Realme Q3s स्मार्टफोन लॉन्च होणार
आज 19 ऑक्टोबरला Realme GT Neo 2T सोबत Realme Q3s स्मार्टफोन पण लॉन्च होणार आहे. Realme ने आपल्या आगामी स्मार्टफोन्समधील काय सुविधा असतील याबाबत टीजरपण प्रदर्शित केला आहे. यात Realme Q3s मध्ये LCD डिस्प्ले असेल. आणि 144Hz पर्यंतचे वेरिएबल रिफ्रेश रेटसोबत HDR10 सपोर्टपण असेल. तर याव्यतिरिक्त एक रियलमी एक्जीक्यूटिव सांगितले की, मागच्या महिन्यात या स्मार्टफोनच्या स्नैपड्रैगन 778G चिपसेटदीदेखील पुष्टि केली होती. TENAA ची लिस्टिंग Realme Q3s चा मॉडल नंबरचा संकेत देते.
- योगी आदित्यनाथ बस्तीच्या दौऱ्यावर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज बस्तीच्या दौऱ्यावर राहणार आहेत. ते बस्तीहून सुभेपूर येथे संसर्गजन्य रोग नियंत्रण अभियानाची सुरुवात करतील. दुपारी ते कुशीनगरकडे रवाना होतील.
- 'या' राज्यात कोविड कर्फ्यूचा आज शेवटचा दिवस
कोरोनाची परिस्थिती पाहता उत्तराखंड राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत कोविड कर्फ्यू लागू करण्यात आला होता. या कोविड कर्फ्यूचा आज शेवटचा दिवस आहे.
- सनी देओल यांचा वाढदिवस
अभिनेते आणि सध्या भाजपा खासदार सनी देओल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1956मध्ये झाला होता. त्यांनी आजपर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.
- कालच्या बातम्या -
- चंदीगड - सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहीमसहित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रणजीत सिंह यांच्या खुनाच्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने राम रहीमला 31 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर इतर आरोपींना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.
वाचा सविस्तर - रणजीत सिंह खून प्रकरण: बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1736, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715 तर, आज सोमवारी 18 ऑक्टोबरला 1485 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
वाचा सविस्तर - Corona Update - राज्यात 1 हजार 485 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 27 रुग्णांचा मृत्यू
- मुंबई - कोरोना रूग्णांची संख्या कमालीची घटल्याने राज्यातील निर्बंध अधिक शिथील केले जाणार आहेत. उपहारगृह, दुकानांच्या वेळा वाढवण्याबरोबरच अम्युझमेंट पार्कही २२ ऑक्टोबरपासून खुले करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासावर निर्बंध कायम राहणार आहेत.
वाचा सविस्तर - Maharashtra Unlock : दिवाळीपूर्वी 'गोड' बातमी.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार
- मुंबई - क्रूझ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी (अमली पदार्थ विरोधी पथक) कडून समुपदेशनाचे धडे देण्यास सुरुवात झाली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार हे समुपदेशनाचे धडे फक्त आर्यन खान यालाचं नाही. तर, प्रत्येक आरोपींना दिले जातात. विशेषतः लहान वयात जे युवा ड्रग्सच्या आहारी जातात त्यांना त्याच वयामध्ये त्याच्यातून बाहेर काढणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच त्यांचं समुपदेशन केले जाते.
वाचा सविस्तर - सर्व आरोपींप्रमाणेच आर्यन खानचेही समुपदेशन - समीर वानखेडे
- नांदेड - राज्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी धाडी होत आहेत हे कारस्थान भाजपाचे आहे, असे महाविकास आघाडी सरकारकडून बोलले जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे काही सापडायला नको ना? अनिल देशमुखांकडीव 340 कोटींची मालमत्ता जप्त झाली. मग काही नव्हतेच, तर मग हे सापडायला नको होते. ते माध्यमांशी बोलत होते.
वाचा सविस्तर - धाडीची भीती वाटत असेल तर महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे काहीच सापडायला नको- चंद्रकांत पाटील
- वाचा आजचे राशीभविष्य -
19 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस आनंदाचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य