नवी दिल्ली : हरियाणाची १८ महिन्यांची माहिरा अखेर जीवनाची लढाई हरली, पण आयुष्याचा प्रवास थांबवताना तिने दोन जणांना नवजीवन दिले. हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील नूह येथील रहिवासी असलेली छोटी माहिरा 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी तिच्या घराच्या बाल्कनीत खेळत होती.
खेळत असताना ती अचानक खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला बेशुद्ध अवस्थेत एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले मात्र शुक्रवारी तिचा मृत्यू Mahira of Haryana died at AIIMS trauma center झाला. मात्र तिच्यामुळे दोन जणांना जीवदान मिळाले Mahira organ saved lives of two people आहे.
तिच्या मृत्यूनंतर तिची आई आणि वडिलांनी माहिराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदान करणारी माहिरा ही दिल्ली एनसीआरमधील दुसरी सर्वात लहान मुलगी आहे. त्यांनी दान केलेले यकृत ILBS मधील 6 वर्षांच्या मुलावर आणि दोन्ही किडनी AIIMS मध्ये 17 वर्षांच्या मुलावर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले. कॉर्निया, दोन्ही डोळे, हृदयाच्या झडपा नंतरच्या वापरासाठी जतन केल्या आहेत.
11 नोव्हेंबरपर्यंत माहिरा जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होती. अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. आणि 11 नोव्हेंबरला सकाळी तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पालकांवर शोककळा पसरली. मात्र त्यांनी आपल्या मुलीचे अवयव इतर रुग्णांना देण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांत एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये अवयव दान करणारी माहिरा ही तिसरी अपत्य आहे. यापूर्वी रोली आणि १८ महिन्यांच्या रिशांतने अवयवदान करून इतरांना जीवनदान दिले होते.