पानीपत - हरयाणातील पानीपत जिल्ह्यातील एका युनिक फॅलिमीची चर्चा अख्या पंचकृषीत सुरू आहे. या कुटुंबात मोडणार्या प्रत्येक सदस्याच्या हाताला किंवा पायाला सहा बोटे आहेत. या खास निशाणीने गावात त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे. यामागे कुटुंबात पिढ्यापासून येणारी अनुवांशिकता आहे. मगे ते पूर्ण बोट असो, किंवा अंगठ्या शेजारी मांसाचा लटकणारा छोटा तुकडा असो, बोटाची निशाणी दिसणारच.
पिढ्यांपासून सर्वांना सहा बोटे -
कुटुंब प्रमुख सुखबीर यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, कुटुंबातील सुमारे १७५ सदस्यांना हाताला किंवा पायाला सहा बोटे आहेत. सहा बोटे असण्याची ही आमची पहिली पिढी नाही. माझ्या आजोबांनाही सहा बोटे होते. सगळ्या गावात आमच्या बोटांचीच चर्चा असते. लोकांना हा एखादा आजार वाटतो. मात्र, आम्ही यास देवाची कृपा समजतो. या कुटुंबात लहान बालके सहा बोटांसहच जन्मतात, असे सुखबीर यांनी सांगितले.
हा एक जन्मदोष, शस्क्रिया उपाय -
सहावे बोट किंवा अंगठा असने हा एक सर्व सामान्य जन्मदोष आहे. यास 'कॉन्जिनियल मालफॅक्शन' असे म्हणतात. यामध्ये व्यक्तीचा जन्म अतिरिक्त बोट किंवा अंगठ्यासह होतो. वैद्यकीय भाषेत यास 'पॉलिडिक्टेली' म्हणतात, असे पानीपतमधील डॉ. सुखबीर कौर यांनी सांगितले. सहाव्या बोटाला काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया हाच उपाय असून यामुळे कोणताही त्रास होत नाही, असे त्यांनी सांगितले.