नवी दिल्ली : हरियाणाच्या करनालमधील एका अल्पवयीन बलात्कार पीडितेने गर्भपाताची परवागनी मागितली आहे. यासाठी तिने सर्वोच्च न्यायालायामध्ये याचिका दाखल केली आहे. बलात्कारानंतर ती गर्भवती झाली होती. ती सध्या २६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
चुलत भावाने केले होते दुष्कृत्य..
या मुलीने आपल्या याचिकेमध्ये सांगितले आहे, की आपल्या चुलत भावानेच आपल्यावर बलात्कार केला होता. यानंतर ती गर्भवती झाली होती. ती या मुलाला जन्म देऊ इच्छित नाही, त्यामुळे न्यायालयाने आपल्याला गर्भपात करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी तिने केली आहे.
शुक्रवारी होणार सुनावणी..
याप्रकरणी मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारपर्यंत स्थगित केली आहे. तसेच, वैद्यकीय बोर्डाने याबाबत आपला अहवाल द्यावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
गर्भपात कायदा..
गर्भपात विरोधी कायद्यानुसार, गर्भधारणेच्या २० आठवड्यांपर्यंतच गर्भपात करण्यास परवानगी असते. त्यानंतर गर्भपात केल्यास तो गुन्हा ठरतो. मात्र, गर्भवती स्त्रीच्या जीवाला किंवा अर्भकाच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यास यामध्ये अपवाद करता येतो.
हेही वाचा : सैनिक स्कूलच्या ५४ मुलांना कोरोनाची लागण; हरियाणाच्या करनालमधील घटना