भोपाळ ( मध्य प्रदेश )- रीवा येथे राहणाऱ्या एका 14 महिन्यांच्या मुलाने असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे त्याला आता रीवाचा गुगल बॉय, असे म्हटले जात आहे. 14 महिन्यांच्या बाळाने अद्भुत स्मरणशक्ती निर्माण केली आहे, ज्यामुळे त्याला काही सेकंदात गोष्टी ओळखतो. आता या चिमुकल्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये ( World Book of Records London ) झाली आहे. या मुलाने वयाच्या 6 ते 8 महिन्यांत प्रतिभा संपादन केली होती आणि आता वयाच्या 14 महिन्यांत त्याचे नाव जागतीक विक्रमासाठी नोंदवले गेले आहे. ( Yashasvi Mishra in London World Book of Record )
14 महिन्याचा "गूगल बॉय" - तुम्हाला गुगल माहिती अलेच, तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट सर्च केली तर त्याचे सर्च इंजिन सुरू होते व त्यानुसार माहिती गुगल आपल्याला पुरवतो. गुगल बॉय म्हणून परिसरात परिचित असलेल्या 14 महिन्याच्या चिमुकल्याने बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडनलाही स्वतःबद्दल विचार करायला भाग पाडले. यशस्वी मिश्रा, असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याची स्मरणशक्ती इकती आहे की, त्याला एखादी गोष्ट किंवा माहिती सांगितली की तो लगेचच लक्षात ठेवतो. थोड्या वेळाने किंवा काही दिवसानंतरही त्याला विचारल्यास तो त्याचे उत्तर देतो.
वयाच्या सहाव्या महिन्यापासून प्रचंड स्मरणशक्ती - यशस्वीचे वडील संजय मिश्रा सांगतात की, वयाच्या सहाव्या महिन्यातच आम्ही त्याच्या आसपास फुलांची चित्रे चिटकवली. त्यानंतर त्याला त्याची माहिती दिली, त्यानंतर तो फुलांचे नाव सांगितल्यास ओळखू लागला. त्यानंतर आता वयाच्या केवळ 14 महिन्यातच ते अनेक देशांचे ध्वज ओळखू लागला आहे.
26 देशांचे ध्वज ओळखतो यशस्वी - 14 महिन्यांच्या यशस्वी मिश्राला त्याच्या पालकांनी जगातील प्रत्येक देशाच्या ध्वजाची माहिती दिली. त्यानंतर काही सेकंदात पुन्हा विचारल्यावर त्याने प्रत्येक देशाचा ध्वज पटकन ओळखला. 14 महिन्यांच्या यशस्वीने एकाच वेळी 26 देशांचे राष्ट्रध्वज ओळखून सर्वांना चकित केले आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड लंडनमध्ये यशस्वीच्या नावाची नोंद - यशस्वीचे आजोबा अवनीश मिश्रा हे शिक्षक असून सध्या ते दुआरी उच्च माध्यमिक विद्यालय, रेवा येथे कार्यरत आहेत. यशस्वीची आई शिवानी मिश्रा आणि वडील संजय मिश्रा हे व्यापारी आहेत. 14 महिन्यांच्या यशस्वीची ही कामगिरी पाहून यशस्वीचे आजोबा, आई आणि वडील हे सर्व यशस्वीला आणखी प्रोत्साहीत करू लागले. आता यशस्वीच्या नावाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्याने जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे.