बंगळुरू - कर्नाटकमध्ये १० मे रोजी सकाळी ६ ते २४ मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी केली आहे. जनता कर्फ्यू लागू करूनही लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबविण्याची कडक कार्यवाही करणे अटळ झाल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा म्हणाले, की लोक हे कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन हे टाळणे शक्य नाही. मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला पाहिजे. अन्यथा, आणखी कडक पाऊल उचलणार येणार आहेत. हे तात्पुरते लॉकडाऊन असणार आहे. मजुरांनी राज्यातून जाऊ नये, अशीही त्यांनी यावेळी विनंती केली आहे.
हेही वाचा-सेंट्रल व्हिस्टाच्या प्रकल्पात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- सर्व हॉटेल्स, पब्स आणि बार लॉकडाऊनच्या काळात बंद असणार आहेत.
- तर मटन शॉप, पालेभाज्यांची दुकाने हे सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
- लॉकडाऊनमध्ये एकाही व्यक्तीला सकाळी १० नंतर परवानगी मिळणार नाही. नियमांचे उल्लंघन करण्यावर कठोर कारवाई करण्याची पोलीस अधिकाऱ्यांना सुचविले आहे.
- राज्यातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण आणि त्यांच्या वाढत्या मृत्यूचे प्रमाण पाहता हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-काँग्रेसच्या नेत्याची भाजप खासदार तेजस्वी सुर्यांसह तीन आमदारांविरोधात पोलिसात तक्रार
गुरुवारी कोरोमुळे ३२८ जणांचा मृत्यू-
कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार गुरुवारी कोरोनाने ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज कोरोनाचा संसर्ग आढळण्याचे प्रमाण २९.८३ टक्के आहे. गतवर्षी १० मार्चपासून राज्यात १७,२१२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.