सिलचर - आसाममधील म्यानमारमधून आणखी 13 रोहिंग्या मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे. यासह बेकायदेशीरपणे उत्तर पूर्व भारतात दाखल झालेल्या 35 म्यानमार रहिवाशांना एका महिन्यात अटक करण्यात आली आहे. यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
आसामच्या करीमगंजमधील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, माहितीच्या आधारावर बुधवारी दक्षिणेकडील आसामच्या चुराईबारी येथून 13 रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते आग्नेय बांगलादेशातील छावणी सोडून पळून जाणारे निर्वासित असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - सफाई कामगारांच्या जीवनात कोणताही बदल नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परदेशी नागरिकांना सहा मुले आणि तीन महिलांसहित अगरतळा ते गुवाहाटीकडे जाणाऱ्या रात्रीच्या बसमधून ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या या महिला व पुरुषांचे वय 20 ते 33 दरम्यान सांगितले जात आहे.
हेही वाचा - काश्मिरातील विजयानंतर गुपकर अलायन्सची बैठक, एकजुटीनं काम करण्याचा व्यक्त केला विश्वास