ETV Bharat / bharat

पंतप्रधानांच्या हस्ते आरबीआयच्या दोन योजनांचा शुभारंभ, आज राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण; टॉप न्यूज वाचा एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Prime Minister launches two RBI schemes
पंतप्रधानांच्या हस्ते आरबीआयच्या दोन योजनांचा शुभारंभ
author img

By

Published : Nov 12, 2021, 5:28 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • आज राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
    राज्यातील 7 हजार 330 शाळांतील राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातअंतर्गत चाचणी आज (12 नोव्हेंबर) होणार आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी शाळेत विद्यार्थांची 100 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिली आहे.
  • पंतप्रधानांच्या हस्ते आरबीआयच्या दोन योजनांचा शुभारंभ
    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन अभिनव ग्राहक केंद्रीत उपक्रमांचा शुभारंभ करणार आहेत.
  • भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार याद्या प्रसिद्ध होणार
    भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत, अशी माहिती ही राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
  • मुंबई महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी यादी जाहीर होणार
    मुंबई महानगरपालिकांमधील विविध सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान यादी जाहीर होणार आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई - कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आली आहे. यावेळी तिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य वरून देशासाठी शहीद झालेल्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. कंगनाच्या विरोधात राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही पत्र लिहुन देशद्रोही विधान करणाऱ्या कंगना राणावत हिचा पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा असे पत्र केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती आम आदमी पार्टीच्या प्रीती मेमन शर्मा यांनी केली आहे. सविस्तर वाचा...
  • दुबई - टी-20 वर्ल्ड कप 2021चा सेमी फायनलचा सामना हा गुरूवारी दुबईत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सहा चेंडू राखून पाच विकेटने नमवले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात मैथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस यांची महत्त्वाची भूमिका होती. दोन्ही खेळाडूंनी 40 चेंडूत 81 रणांची बाजी खेळत आपल्या टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सविस्तर वाचा...
  • मुंबई - आर्यन खान ड्रग(Aryan Khan Drug Case) प्रकरणात एनसीबीच्या SIT कडून प्रभाकर साईलची(Prabhakar Sail) तीन तास चौकशी करण्यात आली आहे. पुन्हा चौकशीला बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणात प्रभाकर साईल हा पंच होता. 25 कोटींच्या डील प्रकरणी अनेक खुलासे साईलने उघड केले होते. सविस्तर वाचा...
  • मुंबई - वक्फ बोर्डाने केलेल्या सात एफआयरनुसार ईडीने आज सात ठिकाणी काही व्यक्तींच्या घरी कारवाई केली, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. वक्फ कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्याच्या वृत्तावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला, तसेच बदनामीसाठी अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा मलिक यांनी देताना राज्यातील नोंदणीकृत वक्फ बोर्डाच्या ३० हजार संलग्नित संस्थांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली. सविस्तर वाचा...
  • मुंबई - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. जगत प्रकाश नड्डा यांचे संध्याकाळी साडे सात वाजता अंधेरी (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल- टी २) येथे आगमन झाले. यावेळी मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार अ‍ॅड. मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष मुंबई भाजपा व आमदार अतुल भातखळकर प्रभारी हे उपस्थित होते. जे.पी. नाडा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते आगामी महापालिका निवडणूकी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सविस्तर वाचा...
  • पणजी - भाजपाला शह देण्यासाठी त्यांच्या नाराज आमदारांना पक्षात घेऊन राज्यात भाजपा विरोधात मोट बांधणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार यांनी सांगितले. भाजपात नाराज असणाऱ्या 7 ते 8 आमदारांना घेऊन सत्ता काबीज करण्याचे मनसुबे काँग्रेस पक्षाने आखले आहेत. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युतीचे संकेतही चोदणकर यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.