चंडीगढ़: पंजाबच्या लुधियानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीथे एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे. पीडितेच्या परिवाराने या प्रकरणाची सुचना पोलिसांना दिली. पोलिसांच्या म्हनण्यानुसार एका युवकाने विवाहाचे आमिष दाखवत 10 महिण्यापुर्वीो तिच्या सोबत दुष्कर्म केले होते.
मुलीच्या वडिलांच्या जवाबावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन तपास सुरु केला आहे. अल्पवयीन पीडित मुलगी एका कारखान्यात काम करते. ती तिच्या कुटुंबासोबत राहते, तिला आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित कुटुंबाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला हा सगळा प्रकार सांगितला. त्या महिलेने पीडितेच्या कुटुंबाला मदत करण्या एैवजी, त्या युवकाला साथ देत त्याच्याकडून पैसै मिळवुन देते असे सांगितले. तसेच त्या पीडितेला पुन्हा सोबत घेउन गेली तीथे त्या मुलीवर पुन्हा अत्याचार झाला. त्यानंतर त्या कुटुंबाने पोलीसांकडे तक्रार केली तेव्हा पोलिसांच्या मदतीने त्या मुलीची त्या महिलेच्या तावडीतून सुटका करण्यात आली. त्या नंतर तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तीथेच तीने मुलाला जन्म दिला. हा प्रकार समोर येताच संबंधित युवक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : धक्कादायक..! मुलीच्या लग्नास नकार दिल्याच्या वादातून बापाची हत्या, आरोपी अटकेत