आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- राष्ट्रपती भवनात राज्यपाल आणि नायब राज्यपालांची परिषद
राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन येथे आज राज्यपाल आणि नायब राज्यपालांची 51 वी परिषद होणार आहे. - काँग्रेसचे पवन खेरा आणि भाई जगताप यांची पत्रकार परिषद
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा आणि भाई जगताप यांची दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद आहे. - तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत रेड अलर्ट
तामिळनाडूतील चेन्नई, तिरुवल्लूर, कल्लाकुरीची, सेलम, वेल्लोर, तिरुपत्तूर, राणीपेट आणि पुद्दुचेरीच्या थिरुवन्नमलाई जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूत काही ठिकाणी गडगडाटी वादळासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. - जयंती हा मराठी चित्रपट आज होणार प्रदर्शित
उत्तम कथानकाचे जाणकार नागराज मंजुळे यांनी बहुचर्चित मराठी चित्रपट "जयंती" चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेयर करत ‘जयंती’ च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. १२ नोव्हेंबर पासून जयंती सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सविस्तर वाचा...
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - ST Strike : ST चा संप चांगलाच चिघळला असून बुधवारी राज्यातील 250 डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून (MSRTC) 918 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या मणक्यात आणि मानेमध्ये त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाकाळात आलेल्या कामाच्या भारामुळे आपल्या तब्येतीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, राज्यातील जनतेला एक भावनिक संदेश त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा...
- नागपूर - राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी हायड्रोजन फोडत नागपूरचे कुख्यात गुंड असलेले मप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या जवळचे आहे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी कुख्यात गुंड म्हणून असलेले यादव यांना बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मात्र हे मुन्ना यादव नेमके कोण आहेत हे जाणून घेऊ या विशेष वृत्तातून...सविस्तर वाचा..
- सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड आणि पाटण सोसायटी मतदार संघात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे अर्ज रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे कराड-पाटणमधील बिग फाईटकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. सविस्तर वाचा...
- नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे रियाज भाटीशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पावडरच्या पैशांतून कुणाचे अल्बम तयार झाले? वरळीत 200 कोटींचे फ्लॅट कुणी घेतले? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. त्यांनी केलेल्या आरोपावर फडणवीसांनी बोलणे टाळले. मात्र मी याबाबत ट्वीट केले आहे ते बोलके आहे असे ते म्हणाले. तसेच आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर बोलत होते. सविस्तर वाचा...
- कोल्हापूर - हिवाळा सुरू झाला की सर्वांना एकच चिंता सतावत असते ती म्हणजे, त्वचेची काळजी कशी घ्यावी? हिवाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी पडत असते. त्यामुळे यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. म्हणूनच याबाबत आज आपण काही हटके गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट.. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -