भोपाळ : मध्य प्रदेशातील एका 100 वर्षीय महिलेने आपली 15 एकर जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दान करण्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यातील मांगीबाई तन्वर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मांगीबाईंना आहेत 14 मुले! : व्हिडिओमध्ये ती महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. ती म्हणाली की, 'पंतप्रधान मोदी देशासाठी खूप काही करत आहेत. त्यांनी माझ्यासाठीही खूप काही केले आहे. त्यांनी वृद्ध लोकांसाठी अन्न आणि निवासाची व्यवस्था केली आहे'. विशेष म्हणजे, मांगीबाईंना 14 मुले आहेत. तथापि, त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी हे त्यांचे पुत्र आहेत कारण त्यांनी त्यांच्यासारख्या वृद्धांच्या प्रत्येक गरजांची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जमीन नरेंद्र मोदींकडे हस्तांतरित करायची आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त : मांगीबाई म्हणाल्या की, त्यांनी नरेंद्र मोदींना आपला मुलगा म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे 15 एकर जमीन मोदींना हस्तांतरित करावी अशी त्यांची इच्छा आहे. त्या म्हणाली की, 'मोदी मला घर देत आहेत आणि माझ्यावर उपचार करून घेत आहेत. त्यांनी माझ्या जेवणासाठी पैसे दिले आहेत. मोदींमुळे मी तीर्थयात्रेला गेले होते.' मांगीबाईंनी आजवर पंतप्रधान मोदींना फक्त टेलिव्हिजनवर पाहिले आहे. पण आता त्यांना भेटण्याची इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या. 'ज्याने विधवा पेन्शन दिले, जगण्याचे साधन दिले आणि घर बांधले, तो फक्त माझा मुलगा मोदी आहे', असे त्या म्हणाल्या.
नरेंद्र मोदींचा मध्य प्रदेश दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दरम्यान ते पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू करतील. नरेंद्र मोदी सकाळी 10.30 च्या सुमारास भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचतील.
हेही वाचा :