ETV Bharat / bharat

Little Painter : 10 वर्षांचा 'भव्य' अनेक महान व्यक्तींची हुबेहुब रेखाडतो चित्रे.. दुसऱ्या मुलांसाठी ठरत आहे आदर्श

देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी रविवारी साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त ईटीव्ही भारतने असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांचे कतृत्व 'बालवीर' या लेख मालिकंतून मांडले आहे..

Bhavya Batra
Bhavya Batra
author img

By

Published : Nov 14, 2021, 6:08 AM IST

जालंधर - चित्रकारी कोणाचा छंद असतो तर कोणाचा पेशा तर काहींचा आत्मा. सुंदर चित्र कोणाचेही मन प्रफुल्लित करते. जालंधर येथे राहणारा भव्य (Bhavya) ही मनमोहक चित्र काढतो. पाचवी वर्गात शिकणाऱ्या भव्यने कोरोना लॉकडाऊन काळात घरात बसून इतकी सुंदर चित्रे काढली की, लोक या चित्रांकडे बघतच राहिले. आपल्या या अप्रतिम चित्रकारीमुळे भव्य आता खूप प्रसिद्ध झाला आहे.

जालंधरच्या रोज गार्ड परिसरात नील बत्रा राहतात व तेथेच त्यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांच्या कुटूंबात पत्नी वंदना, मोठा मुलगा तनीश व छोटा मुलगा भव्य आदी सदस्य आहेत. नील मागील अनेक दिवसांपासून येथे राहतात, मात्र लोक आता भव्यचे पप्पा म्हणून अधिक ओळखतात. कारण भव्यने छोट्या वयात चित्रकारीमध्ये अशी प्रतिभा दाखवली आहे, ज्याची चर्चा पंजाबसह संपूर्ण देशात होत आहे.

10 वर्षांचा 'भव्य' अनेक महान व्यक्तींची हुबेहुब रेखाडतो चित्रे

10 वर्षाच्या भव्यने आपल्या छोट्या हातांनी महापुरुषांची व प्रसिद्ध लोकांची चित्रे काढली आहेत. आता अनेक लोक भव्यकडून आपली चित्रे काढून घेत आहेत. भव्य सांगतो की, त्याने वयाच्या सहाव्या वर्षापासून चित्रकारी सुरू केली. आतापर्यंत त्याने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे काढून त्यांना भेट दिली आहे. त्याने भगत सिंग, राजगुरु, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम सारख्या महान व्यक्तींचे पेंटींग बनवले आहे.

भव्यचे वडील नील बत्रा यांचे म्हणणे आहे की, मुलाच्या कलेने त्यांना शहरात प्रसिद्ध केले आहे. सध्या ते भव्य चे आई-वडिलांच्या रुपातच ओळखले जातात. आज परिसरातील अनेक मुले भव्यकडून चित्रकारी शिकण्यासाठी येत असतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या कलेचा अभिमान आहे.

हे ही वाचा - कोल्हापुरातल्या 'या' गावडे बहिणींचा आगळावेगळा विक्रम; बालदिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ची विशेष मुलाखत

ज्या वयात मुले त्यांच्या आई-वडिलांकडून कहाण्या ऐकतात त्याच वयात भव्य दूसऱ्या मुलांसाठी आदर्श ठरत आहे. भव्य म्हणतो की, दुसऱ्या मुलांनीही वेळेचा सदुपयोग करून काहीतरी करावे, जेणेकरून संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटेल.

हे ही वाचा - Google Boy : अडीच वर्षाच्या बालकाची उत्तरे ऐकून डोकं जाईल चक्रावून.. मेमरीत फीड जगभरातील जनरल नॉलेज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.