गया : बिहारच्या गयामध्ये तीन अल्पवयीन मुलांनी १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत कारवाई केली. हे प्रकरण गया जिल्ह्यातील बोधगया पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुलगी बोधगया पोलीस स्टेशन हद्दीतील शेताच्या जवळून जात असताना तीच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पीडिता घरी आल्यावर तिने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.
वडिलांनी घेतली पोलिसात धाव : कुटुंबीयांनी घटनेची माहिती तात्काळ बोधगया पोलीस ठाण्याला दिली. पीडितेच्या वडिलांच्या वतीने महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी घटना गांभीर्याने घेत विशेष टीम तयार करून कारवाई सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक, बोधगया पोलिस स्टेशनचे प्रमुख, महिला पोलिस स्टेशनचे प्रमुख, तसेच बोधगया एसडीपीओच्या नेतृत्वाखालील तांत्रिक सेलच्या विशेष टीममध्ये समावेश केला आहे.
आरोपींना लवकरच शिक्षा : याप्रकरणी कारवाई करताना विशेष पोलिस पथकाने तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात महिला ठाण्याचे पोलीस ताब्यात घेतलेल्या मुलांवर पुढील कारवाई करत आहेत. या प्रकरणात जलद गतीने न्यायालयात खटला चालवून शिक्षा दिली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
'गया जिल्ह्यातील बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ मुलांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारवाई करताना विशेष पोलीस पथकाने तिन्ही मुलांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई चालू आहे'- आशिष भारती, वरिष्ठ पोलीस अधीक्षक गया
हेही वाचा - CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सटकली, म्हणाले, माफिया को मिट्टी में देंगे...