ETV Bharat / bharat

ग्वाल्हेरमध्ये बस-ऑटोचा भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू - ग्वाल्हेर बस-ऑटो अपघात मृत्यू न्यूज

ग्वाल्हेरमध्ये झालेल्या बस आणि ऑटोच्या धडकेत १० प्रवाशांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

Gwalior bus-auto accident news
ग्वालियर बस-ऑटो अपघात न्यूज
author img

By

Published : Mar 23, 2021, 7:19 AM IST

Updated : Mar 23, 2021, 12:42 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये बस आणि ऑटोची धडक झाली. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जुनी छावणी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. हा अपघात मध्य प्रदेशातील आतापर्यंतच्या मोठ्या अपघातांपैकी एक ठरला आहे. या अपघातात मरण पावलेल्या सर्व महिला पिंटू पार्कमध्ये राहणाऱ्या होत्या. त्या अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण आहार शिजवण्याचे काम करत होत्या.

बसने ऑटोला दिली धडक -

अपघातातील सर्व महिला दोन ऑटोंनी घरी परत येत होत्या. अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर एक ऑटोरिक्षा खराब झाली. त्यामुळे सर्व महिला एकाच रिक्षामध्ये बसल्या. पुढे गेल्यानंतर ग्वाल्हेरकडून मुरैनाला जाणाऱ्या एका बसने रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की 10 महिलांचा जागेवरच मृत्यू झाला तर, आणखी तिघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक अमित संघी यांनी देखील 13 महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

मध्य प्रदेशातील काही भीषण अपघात -

14 मे 2020ला गुनामध्ये झालेल्या अपघातात 8 मजूरांचा मृत्यू झाला होता तर, 50पेक्षा जास्त मजूर गंभीर जखमी झाले होते.

भोपाळपासून 50 किमी अंतरावर पर्यटकांच्या बसला अपघात झाला होता. त्यात 11 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर 25 जखमी झाले होते.

2019 मध्ये रायसेन दरगाह जवळ भोपाल-छतरपुर बस अनियंत्रित होऊन रीछन नदीत कोसळली होती. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता.

2019मध्ये रीवा परिसरात बस आणि ट्रकची धडक होऊन 9 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर, १० जण जखमी झाले होते.

14 ऑक्टोबर 2016ला रतलाममध्ये पाण्याच्या खड्ड्यात बस पडून 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 17 जखमी झाले होते.

Last Updated : Mar 23, 2021, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.